Aurangabad Political News : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १६ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यासाठी महापालिकेना आपल्या विविध मागण्या आणि त्यासाठी तब्बल २ हजार कोटींचा निधी मिळावा, यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. (Aurangabad Municipal Corporation News) महापालिका प्रशासनाने दोन हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यात आंतररराष्ट्रीय दर्जाचे स्टेडिअम उभारणे, शहर परिसरात ड्रेनेजलाइन टाकणे, महापालिका मुख्यालयाच्या इमारत बांधणे यासह इतर कामांचा समावेश आहे.
मराठवाडा (Marathwada) मुक्तिसंग्रामाचे यंदाचे अमृतमहोत्सवी वर्ष असून, त्यानिमित्ताने १७ सप्टेंबरला शहरात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेला शासनाने ४० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. (Municipal Corporation) त्यानुसार प्रशासनातर्फे कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शहरात येऊन तयारीचा आढावा घेतला. दरम्यान, १६ ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची शहरात बैठक होणार असून, त्यात मराठवाड्याच्या विकासाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
त्यामुळे महापालिकेने मंत्रिमंडळासमोर निधीचा प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा आहे. (Aurangabad) प्रशासक जी. श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यात प्रस्ताव तयार केला आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात आंतरराष्ट्रीय स्टेडीयम बांधण्याचा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला आहे. स्टेडियमच्या उभारणीसाठी सुमारे २५० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.
त्यासोबत शहर परिसरात नव्याने विकसित झालेल्या भागात ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात ५५० कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. महापालिका मुख्यालयाची इमारत उभारण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. या प्रस्तावासह इतर कामांसाठी निधीची मागणी शासनाकडे केली जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीसाठी येणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्र्यांच्या हस्ते १७ विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजन केले जाणार आहे.
त्यात सातारा देवळाई भागात ड्रेनेजलाइन टाकणे, हर्सूल कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घघाटन, हर्षनगर येथे आपला दवाखाना, प्रभाग १० कार्यालय, स्मार्ट गुरू ॲप, एज्युकेशन कंट्रोल रूम, कांचनवाडी येथे अग्निशमन केंद्र, मोबाईल स्वच्छतागृह, पाच शाळांमध्ये सिथेंटिक ट्रॅक, कमल तलाव सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन यासह इतर कामांचा समावेश आहे.
या आहेत प्रमुख मागण्या -गरवारे स्टेडियमचा आंतरराष्ट्रीय स्टेडीयम म्हणून विकास करणे. नो-नेटवर्क भागात ड्रेनेजलाइन टाकणे, महापालिका मुख्यालयाची इमारत उभारणे,आम्हाला खेळू द्या’, अभियानाअंतर्गत मैदाने, खुल्या जागांचा विकास करणे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाचे नूतनीकरण, पाणचक्की, मकई गेट येथे पूल बांधणे, शहरात नाल्यांना संरक्षण भिंत बांधणे, सायन्स सेंटर, स्मार्ट रस्ते विकसित करणे, विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे यांचा समावेश आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.