Pune News: पुणे महानगरपालिकेच्या गेल्या काही निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक 23 या भागातून आंदेकर कुटुंबातील दोन ते तीन नगरसेवक निवडून आल्याचं समोर आलं होतं.पूर्वी आंदेकर कुटुंब हे काँग्रेसमध्ये होतं. पण नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालं. पण गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या आयुष कोमकर हत्येप्रकरणात आंदेकर कुटुंबाला तुरुंगात जाव लागलं. मात्र, आता जेलमधून निवडणूक लढवलेल्या आंदेकर कुटुंबानं पुणे महानगरपालिका निवडणुकीत विजयाचा पहिला गुलाल उधळला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या पत्नी सोनाली आंदेकर या विजयी झाल्या आहेत. तर सोनाली आंदेकरांच्या सासू लक्ष्मी आंदेकर पराभूत झाल्या आहेत. सोनाली आंदेकर यांनी 10809 मतं मिळवली, तर प्रतिभा धंगेकर यांना 8,859 मतं मिळाली. या निवडणुकीत सोनाली आंदेकरांनी अखेर बाजी मारत धंगेकरांना पराभवाचा धक्का दिला. सोनाली आंदेकर यांचा 3228 मतांनी तर लक्ष्मी आंदेकर यांचा 140 मतांनी विजय झाला आहे.
नातवाच्या खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या बंडू आंदेकरसह वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या दोघींनी सुद्धा न्यायालयाला पुणे महापालिका निवडणूक लढवण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती. त्यानंतर पुणे मनपा निवडणूक लढवण्यास सत्र न्यायालयाकडून सशर्त परवानगी दिली होती. यानंतर पोलिस बंदोबस्तात बंडू आंदेकर,सोनाली आंदेकर,लक्ष्मी आंदेकर हे निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुण्यात दाखल झाले होते.
पण त्यानंतर सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट देण्यात आलं होतं. यावरुन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. कोणतीही मिरवणूक,प्रचारयात्रा,घोषणाबाजी,सार्वजनिक भाषणे करू नये,अशी ताकीद देत न्यायालयाने निवडणूक लढवण्याची परवानगी दिल्यानंतर वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर यांनी ही बाजी मारली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत यंदा आरोप-प्रत्यारोपांनी राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली होती. त्यातही पुण्याच्या महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 23 रविवार पेठ- नाना पेठ लढतींकडे लक्ष लागलेलं होतं. कारण या प्रभागावर गुन्हेगारी जगतात मोठा दबदबा असलेल्या आंदेकर कुटुंबासाठी ओळखला जातो.
या प्रभागावर आंदेकर कुटुंबाचा गेली कित्येक दशकं वर्चस्व राहिलं आहे.पण आगामी निवडणुकांच्या तोंडावर पुणे शहरात आंदेकर-कोमकर टोळीयुध्द भडकलं आहे.या टोळीयुद्धातूनच झालेल्या आयुष कोमकर आणि गणेश काळे हत्येप्रकरणी संपूर्ण बंडू आंदेकर कुटुंब तुरुंगात आहे. याच प्रभागात सोनाली आंदेकर आणि प्रतिभा धंगेकरांमध्ये कडवी लढत झाली. या लढतीत अखेर सोनाली आंदेकर विजयी झाल्या.
गेल्या काही निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक 23 या भागातून आंदेकर कुटुंबातील दोन ते तीन नगरसेवक निवडून येत असल्याचं पाहायला मिळत आलं आहे. पूर्वी आंदेकर कुटुंब हे काँग्रेसमध्ये होतं. काँग्रेस असताना आंदेकर कुटुंबातील वत्सला आंदेकर या महापौर देखील राहिल्या आहेत. 2017 आणि 2012 मधील निवडणुकीमध्ये देखील आंदेकर कुटुंबातील सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) निवडणूक रिंगणात उतरले होते. या निवडणुकीतही कुटुंबातील दोन व्यक्ती नगरसेवक म्हणून महापालिकेत पोहोचल्याचं पाहायला मिळालं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.