Bandu Andekar: आंदेकर गँगची राजकारणात पुन्हा एन्ट्री; बंडू आंदेकरसह तीन जण PMC निवडणूक लढणार, कोर्ट काय म्हणाले?

Bandu Andekar to Contest PMC Election: बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी, सून सोनाली यांनी त्यांचे वकील ॲड. मिथुन चव्हाण यांच्यामार्फत ‘पुणे महापाालिकेची आगामी निवडणूक लढविण्यास परवानगी मिळावी,’ असा अर्ज मकोकाच्या विशेष न्यायालयात केला होता.
Bandu Andekar to Contest PMC Election
Bandu Andekar to Contest PMC ElectionSarkarnama
Published on
Updated on

Pune Crime News Andekar Gang : आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी बंडू आंदेकर पुणे महापालिका निवडणूक लढविणार आहे. महापालिका निवडणूक लढविण्यासाठी त्याला विशेष मकोका न्यायालयाने परवानगी दिली आहे.

माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर यांचा नाना पेठेत खून करण्यात आला होता. याप्रकरणी सूर्यकांत उर्फे बंडू आंदेकर याच्यासह पंधरा आरोपींना अटक करण्यात आली आहे. आंदेकर टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सध्या हे सर्व जेलमध्ये आहेत.

नाना पेठेतील डोके तालिमजवळ १ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरची निर्घृण हत्या झाली. रात्री ९ वाजता वनराज आपल्या चुलत भाऊ शिवमशी बोलत असताना १०-१५ तरुणांनी सहा दुचाकीवरुन येऊन वनराज यांच्यावर हल्ला केला होता. हल्लेखोरांनी रस्त्याची वीज बंद केली आणि वनराजला वेढा घातला होता. त्यांच्यावर पाच गोळ्या झाडून कोयत्याने डोक्यावर हल्ला केला होता.या हल्लात वनराज जागीच ठार झाला. वनराजच्या हत्येला त्यांच्या घरातील कौटुंबिक कलह कारणीभूत असल्याचे समोर आले हो

गणेश विसर्जन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष याचा नाना पेठेत खून करण्यात आला. आयुष कोमकर हा बंडू आंदेकरचा नातू आहे. कोमकर खून प्रकरणात सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ७०), भावजय माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), सून सोनाली वनराज आंदेकर (वय ३६), मुलगा कृष्णा (वय ४२) यांच्यासह १५ आरोपींना अटक करण्यात आली होती.

आंदेकर टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. आयुष कोमकर यांच्या आईच्या फिर्यादीवरून आंदेकर टोळीतील बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर यांच्यासह १३ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

Bandu Andekar to Contest PMC Election
न्यायाधीश, निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची महाभियोगाची प्रक्रिया कशी असते?

बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी, सून सोनाली यांनी त्यांचे वकील ॲड. मिथुन चव्हाण यांच्यामार्फत ‘पुणे महापाालिकेची आगामी निवडणूक लढविण्यास परवानगी मिळावी,’ असा अर्ज मकोकाच्या विशेष न्यायालयात केला होता. न्यायालयाने त्यांना निवडणूक लढण्यास परवानगरी दिली आहे. ‘आरोपींना नियमानुसार निवडणूक लढविण्याचा आधिकार आहे,’ असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. ‘लोकप्रतिनिधी अधिकार कायद्यान्वये आंदेकर यांना निवडणूक अर्ज भरण्याचा अधिकार आहे,’ असे आंदेकर यांचे वकील चव्हाण यांनी युक्तिवादात सांगितले होते.

विशेष न्यायाधीश एस.आर.साळुंके यांनी आंदेकर यांचा अर्ज मंजूर केला आहे. त्यांनी निवडून लढण्यास परवानगी दिली आहे. ‘निवडणूक लढविणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. त्यासाठी न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता नाही,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Bandu Andekar to Contest PMC Election
Harshvardhan Jadhav: 'फडणवीस सरकार दिवाळखोर' म्हणणाऱ्या माजी आमदाराला विधीमंडळ परिसरात बोलण्यास मज्जाव!

आंदेकर टोळीची राजकारणात एन्ट्री

  • १९९७ च्या पुणे महापालिका निवडणुकीत आंदेकर टोळीने एन्ट्री केली होती. चार टोळी सदस्य नगरसेवक झाले होते.

  • वत्सला आंदेकर (बंडूची बहीण) ही १९९८-९९ मध्ये पुण्याची महापौर झाली. त्या “अक्का” म्हणून परिचित होत्या.

  • उदयकांत आंदेकर (१९९२ मध्ये नगरसेवक),

  • राजेश्री आंदेकर (२००७ आणि २०१२ मध्ये नगरसेविका)

  • वनराज आंदेकर (२०१७ मध्ये NCP चे नगरसेवक)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com