Uddhav Thackeray | Tejasvi Ghosalkar
Uddhav Thackeray | Tejasvi Ghosalkar Sarkarnama

Mumbai Election Results: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा दणदणीत विजय; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पराभवाचा मोठा धक्का

BJP Tejasvee Ghosalkar election win : भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांनी महापालिका निवडणुकांच्या काही दिवस आधीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. घोसाळकरांचा भाजपप्रवेश हा शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का होता.
Published on

Mumbai News : राज्यातील बहुचर्चित महापालिका निवडणुकांचे निकाल आता समोर येऊ लागले आहे. यात काही लक्षवेधी निवडणुकीत धक्कादायक निकालांची नोंद झालेली पाहायला मिळाली. त्यातच ठाकरे बंधूंनी प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मुंबई महापालिकेत सत्तांतर होणार असल्याचं जवळपास निश्चितच मानलं जात आहे. अशातच दहिसर वॉर्ड क्रमांक 2 मध्ये भाजप उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी दणदणीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आव्हान मोडीत काढत विजय मिळवला.

भाजपच्या तेजस्वी घोसाळकर (Tejaswee Ghosalkar) यांनी महापालिका निवडणुकांच्या काही दिवस आधीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. घोसाळकरांचा भाजपप्रवेश हा शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का होता. पण मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी वर्णी लागल्यानंतरच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानं त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. मात्र,त्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर अचानक त्यांनी भाजपप्रवेश करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या तेजस्वी घोसाळकर या मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच आघाडीवर होत्या. यानंतर त्यांनी दुसर्‍या फेरीत फेरीअखेर 11 हजार 964 मतं घेत मोठी आघाडी घेतली.तेव्हाच त्यांचा विजय निश्चित झाला होता. कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या धनश्री कोलेगेंना त्यावेळी अवघे 4 हजार 115 मतं होती.

यानंतर झालेल्या मतमोजणीत तेजस्वी घोसाळकर यांना एकूण 16 हजार 484 मतं तर शिवसेनेच्या धनश्री कोलगेंना 5 हजार 729 मतं पडली.या लढतीत तब्बल 10 हजार 755 मतांनी तेजस्वी घोसाळकर यांनी दिमाखदार विजय मिळवला.

Uddhav Thackeray | Tejasvi Ghosalkar
Pune Election Result: सातव्यांदा नगरसेवक होण्याचे स्वप्न भंगले; माजी उपमहापौरांना महापालिका सभागृहाचा रस्ता बंद; भाजपने धूळ चारली

भाजपकडून विजय मिळवलेल्या तेजस्वी घोसाळकरांचे सासरे विनोद घोसाळकर हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार आहेत. त्यांनी मातोश्रीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. ते या महापालिका निवडणुकीत दहिसर वॉर्ड क्रमांक दोनमध्ये सूनबाई तेजस्वी घोसाळकरांविरोधात ठाकरेंच्या उमेदवार धनश्री कोलगे यांचा प्रचार करताना दिसून आले होते.

एका फेसबुक लाईव्ह दरम्यान फेब्रुवारी 2024 मध्ये अभिषेक घोसाळकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. पतीच्या हत्येनंतर होत असलेल्या पहिल्यादांच महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याआधी त्यांनी केलेला भाजप प्रवेश चर्चेचा विषय ठरला होता.यामुळे या लढतीकडे मुंबईसह राज्याचं लक्ष लागलेलं होतं. तसेच प्रचारात त्यांना सहानुभूतीच्या लाटेचा फायदा झालेला दिसून येत आहे. तसेच अभिषेक घोसाळकर यांनी त्यांच्या नगरसेवकपदाच्या कार्यकाळात केलेली कामं, जोडलेला दांडगा जनसंपर्क या निवडणुकीत तेजस्वी घोसाळकरांच्या विजयासाठी महत्त्वाचा ठरल्याची माहिती समोर येत आहे.

Uddhav Thackeray | Tejasvi Ghosalkar
Eknath Shinde Shiv Sena setback : अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेला मोठा धक्का; शिंदेंचा गड ढासळला, नवख्या मोहितेंनी खेचली बाजी!

याचवेळी भाजपच्या प्रचार यंत्रणेनंही घोसाळकरांच्या विजयात पडद्यामागं निर्णायक भूमिका बजावली असल्याची चर्चा आहे. याचवेळी तेजस्वी यांनी आपल्या लहान मुलासह मुलीलाही सोबत घेत रोड शो केला होता.तो चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता.

या रोड शोनंतर वॉर्डमध्ये वातावरण फिरल्याचं बोललं जात आहे.कारण मतदानाला जाण्याआधी अभिषेक घोसाळकरांच्या आठवणीत प्रचंड भावूक होताना तेजस्वी घोसाळकर दिसून आल्या होत्या. त्यांचे ते फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com