State Backward Classes Commission Sarkarnama
पुणे

Anand Niragude Resign : आरक्षणावर चर्चा होण्यापूर्वीच मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निरगुडे यांचा राजीनामा

State Backward Classes Commission Chairman : मराठा आरक्षणावर आज चर्चा होणार आहे.

Mangesh Mahale

Pune News : मराठा आरक्षणावर आज (मंगळवारी) चर्चा होणार आहे. या चर्चेपूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिला आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पेटलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्दांवर आज वादळी चर्चा अपेक्षित आहे. त्यापूर्वी निरगुडे यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

राज्य सरकारने आनंद निरगुडे यांचा राजीनामा स्विकारला आयोगाच्या कामकाजात राज्य सरकारमधील दोन मंत्री आणि न्यायमूर्ती दिलीप भोसले हस्तक्षेप करत असल्याने आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे निरगुडे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. आज त्यांनी राजीनामा दिला. गेल्या काही दिवसांपासून राज्य मागासवर्ग आयोगात राजीनाम्यांचं सत्र सुरुच आहे.

मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनीच राजीनामा दिल्याने आरक्षणाचा पेच कायम आहे. नवीन अध्यक्षांची नेमणुकीनंतर मागासवर्ग आयोगाच्या कामाला वेग येणार असल्यामुळे आयोगाचा अहवाल येण्यास विलंब होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.

दोन मंत्र्यांच्या दबावामुळे राजीनामा?

महिनाभरात आयोगातील चार सदस्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता अध्यक्षांनीच राजीनामा दिल्याने आयोगात नेमकं काय चाललंय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आयोगाच्या कामात सरकारमधील दोन मंत्री हस्तक्षेप करीत असल्याने निरगुडेंनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. निरगुडे यांना राजीनामा देण्यास भाग पाडणारे ते दोन मंत्री कोण, असा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे.

अमूक एका माहितीचाच आग्रह सरकारकडून केला जात आहे. मात्र, आयोग स्वायत्त असून सर्व्हेक्षणातून पुढे आलेली माहितीच आम्ही सरकारला देऊ शकतो. त्याव्यरिक्ति माहिती द्यावी, असे सांगितले जात असेल तर काम करणे अवघड आहे, असेही आयोगाचे सदस्य आणि अध्यक्षांचं म्हणणं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT