Hemant Patil News: हेमंत पाटलांचा राजीनामा ही नौटंकी; सत्तारांनी वात पेटवली.. पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार...

Hingoli New : हेमंत पाटलांच्या उपस्थितीत सत्तारांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करीत निशाणा साधला.
Hemant Patil News
Hemant Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Hingoli New: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला होता. त्याचा राजीनामा नाट्यावरून शिंदे गटातील नेते, मंत्री अब्दुल सत्तार यांनी आक्षेप घेतला आहे. हेमंत पाटलांच्या उपस्थितीत सत्तारांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करीत निशाणा साधला.

सत्तार यांच्या त्या वक्तव्यावर हेमंत पाटील भडकले. "आपण राजीनाम्याची नौटंकी करत नाही, जे बोलतो तेच करतो मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने बोलताना भान ठेवलं पाहिजे," अशा शब्दात पाटलांनी सत्तारांवर पलटवार केला. दोन्हीमध्ये शाब्दीक युद्ध रंगले. सत्तारांच्या विरोधात हिंगोलीत शिवसैनिक संतापले आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेना संपर्क प्रमुख आनंदराव जाधव तक्रार करणार आहेत.

Hemant Patil News
Jalna News: अर्जुन खोतकरांच्या कार्यकर्त्यावर गोळीबार; जालना शहरात खळबळ...

हेमंत पाटील हे अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आता मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहेत. मराठा आरक्षणासाठी खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्तार यांनी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोलीत जाहीर कार्यक्रमात पाटलांचा राजीनामा खोटा असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर हेमंत पाटील हे चांगलेच अडचणीत सापडले. मात्र आपण नौटंकी करीत नाही, जे बोलतो तेच करतो, असे म्हणत मंत्री पदावर असलेल्या व्यक्तीने बोलताना भान ठेवले पाहिजे असे म्हणत सत्तारांना मुख्यमंत्री शिंदे नक्की समज देतील," असे पाटील म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून खासदार हेमंत पाटील यांनी त्यांच्या लोकसभा अध्यक्षांकडे खासदारकीचा राजीनामा सोपवला आहे.राजीनामा दिल्यानंतर त्यांनी लोकसभेच्या कामकाजाकडे पाठ फिरविली. राष्ट्रपतींनी पाटील यांना समन्स बजावून उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ते गेल्या सोमवारी लोकसभा अध्यक्षांपुढे हजर झाले. परंतु, त्यांनी अधिवेशनादरम्यान कुठल्याही कामकाजात सहभाग घेतला नाही. आता त्यांच्या राजीनाम्यावर लोकसभा अध्यक्ष योग्य तो निर्णय घेणार असून, लोकसभा अध्यक्षांच्या कोर्टात असून काय निर्णय येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Hemant Patil News
Dheeraj Sahu News: धीरज साहू काँग्रेसचे ATM; गांधी परिवारावर भाजपचा हल्लाबोल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com