Adharao Patil, Muralidhar Mohol, Sunetra Pawar  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : महायुतीचे तीन्ही उमेदवार 18 एप्रिलला अर्ज भरणार !

Sunetra Pawar, Adharao Patil, Muralidhar Mohol will file nomination on 18 April सुनेत्रा पवार, आढळराव पाटील, मुरलीधर मोहोळ १८ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार

मिलींद संगई

Baramati Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असून महायुती तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर, पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने सुनेत्रा पवार, शिवाजीराव आढळराव पाटील, मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या तीन्ही उमेदवारांचे अर्ज 18 एप्रिलला भरण्यात येणार आहे.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्धार महायुतीत सहभागी झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपने केला आहे. यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची रणनिती महायुतीच्या माध्यमातून आखली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील नेते यासाठी जोरदार कामाला लागले असून महाराष्ट्रातून 45 पेक्षा अधिक जागा विजयी करून मोदींचे हात बळकट करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारात विशेष लक्ष देण्यास सुरूवात केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचाच एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यातील तीन्ही उमेदवारांचे अर्ज एकाच दिवशी भरले जाणार आहेत. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री (CM) एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. या उमेदवारांचे अर्ज दाखल केल्यानंतर पुण्यात मोठी सभा घेतली जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.यासाठी या तिन्ही मतदारसंघातील महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांसह व पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

दरम्यान, मंगळवारी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. यामध्ये मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचा कडक शब्दात समाचार घेत त्यांच्यावर टीका केली. मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले, तुम्ही इतके वर्ष ज्या पद्धतीने पवारांच्या पाठीशी उभे होतात, त्याच पद्धतीने तुम्ही या निवडणुकीतही पवारांच्या पाठीशी उभे राहा, जेथे पवार आडनाव आहे तेथीलच बटण दाबायचे, ही परंपरा खंडित करायची नाही. राज्य सरकारच्या विकास निधी सोबतच केंद्राच्या विकासनिधीची जोड मिळाली तर बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास अधिक गतीने होईल, यासाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना या निवडणुकीत संधी देण्यात आली असल्याचे पवार म्हणाले.

(Edited by - Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT