बारामतीमध्ये आज (मंगळवार) राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. 'बारामती शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शंभर टक्के विकासकामं मी केली आहेत. मात्र, खासदारांनी त्यांच्या कार्य अहवालात ही कामं आम्हीच केली असल्याचं छापलं आहे,' असं अजित पवार यांनी सांगितलं.
तसेच, 'सध्याच्या विद्यमान खासदारांच पुस्तक वाचायला मिळालं, त्यामध्ये नव्या नगरपालिकेच्या इमारतीचे निधी देण्यापासून ते डिझाइन करण्यापर्यंत सर्व कामं मी केली असताना विद्यमान खासदार त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत,' असं अजित पवार(Ajit Pawar) यांनी सांगितलं आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी हसून प्रतिक्रिया दिली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) बारामती मतदारसंघात प्रचार दौऱ्यावरती आहेत. या दरम्यान त्यांच्याशी प्रसिद्धी माध्यमांनी संवाद साधला. या वेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे डिसेंबरपासून मी राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारला सातत्याने दुष्काळाबाबतचे प्रश्न सोडवण्याची विनंती करत आहे. सध्या राज्यभरामध्ये दुष्काळ अत्यंत तीव्र असून, चारा छावण्या उभारणं आवश्यक आहे. तसेच टँकरचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. मात्र, हे सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे.'
तसेच राज्यातील तसंच देशभरातील कष्टकरी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी ही मागणी मी सातत्याने करत आहे. मात्र, या सरकारला पाण्याचे नियोजन करण्यासाठी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी वेळ नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
सुप्रिया सुळे यांच्या कार्य अहवालात अजित पवार यांनी केलेलीच कामं दाखवण्यात आली आहेत. या टीकेला उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी , ठीक आहे आता, बोलू दे लोकशाही आहे. वास्तव सगळ्यांनाच माहीत आहे,' अशा शब्दांत हसून प्रत्युत्तर दिलं.
तसेच, अजित पवार बारामती नेमकं काय बोलले आहेत. हे ऐकल्यावर प्रतिक्रिया देणार असल्याचे सांगत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर अधिक बोलणे टाळलं.
याचबरोबर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'ज्यांना मी खूप सुसंस्कृत समजत होते, असे एक भाजपचे चंद्रपूरचे नेते आहेत. ज्यांनी पंतप्रधानांसमोर एक विधान केलं आहे, जे प्रचंड अस्वस्थ करणारं आहे. माझ्या तोंडून मी त्याच्याबदद्ल कधी बोलूही शकत नाही. त्यामुळे हे दुर्दैव आहे आणि माझी एवढीच अपेक्षा आहे, की अशी अश्लील भाषा कधीही कोणी बोलू नये.
कारण, आपण एक सुसंस्कृत राज्यात आहोत आणि ते ऐकल्यानंतर मला खरंतर एक धक्का बसला आहे. हे दुर्दैवं आहे, कोण पाठीशी घालतंय की नाही हे मला माहीत नाही. पण अतिशय गलिच्छ असं ते वक्तव्य आहे. मोदी(Narendra Modi) हे काय फक्त पक्षाचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत. पंतप्रधानांचा मान सन्मान केलाच पाहिजे, पण हा एक सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. यामध्ये अश्लील आणि गलिच्छ विधान करणं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि याचा जाहीर निषेध केला पाहिजे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.