Ajit Pawar Speech : दिल्लीत बायकोची पर्स फिरवत बसायला मी एवढा लेचापेचा वाटलो का?: अजितदादांचा सुळेंना टोला

Baramati Lok Sabha 2024 : मी बारा गावचं पाणी प्यायलो आहे आणि इतरांनाही पाजतो आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे आमच्यावर टीका करताना समोरच्यांनी थोडातरी विचार करावा.
Supriya Sule-Ajit Pawar
Supriya Sule-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati, 09 April : बारामती लोकसभा मतदारसंघातील दोन पवारांमधील लढाई दिवसेंदिवस धारदार होत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगात आल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी दुष्काळी भागाचा दौरा केला, त्यावेळी नामोल्लेख टाळून अजित पवारांवर टीका केली. त्याला अजित पवार यांनी आज उत्तर दिले. तसेच, खासदार सुप्रिया सुळे यांच्या टीकेलाही उत्तर दिले. खडकवासला मतदारसंघ घड्याळाला एक लाखाचे मताधिक्य देणार आहे, त्यामुळे बारामतीसह इतर तालुक्यांनीही भावनिक न होता घड्याळ चालवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

बायकोची पर्स दिल्लीत फिरवत बसायला मी एवढा लेचापेचा नेता आहे का? मी बारा गावचं पाणी प्यायलो आहे आणि इतरांनाही पाजतो आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे आमच्यावर टीका करताना समोरच्यांनी थोडातरी विचार करावा. मी टीका करण्यापेक्षा विकास कामाला अधिक महत्व देतो, त्यामुळे माझी पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) ही बारामतीकरांच्या पाठिंब्यावर आणि माझ्या विकासकामांच्या जोरावर निवडून येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Supriya Sule-Ajit Pawar
Solapur News : सोलापुरात मराठा समाज भाजपविरोधात आक्रमक; वडवळमध्ये सातपुतेंना विरोध, खंडाळीत पदाधिकाऱ्याचा निषेध

बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी अजित पवार यांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ८० टक्के आमदार, खासदार आणि कार्यकर्ते भाजपसोबत गेले आहेत. निवडणूक आयोगाने हे बघूनच राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह आम्हाला दिले. त्यामुळे पक्ष चोरून नेला, असे शरद पवार यांनी म्हणणे चुकीचे आहे. मोदी हेच २०२४ मध्ये पुन्हा पंतप्रधान होतील, असे सांगितले होते. त्यानुसारच आम्ही भाजपसोबत जाण्याचे ठरविले होते. मात्र, शरद पवारांनी ऐनवेळी भूमिका बदलली, त्याचा पवारसाहेबांसह सर्वांनाच त्रास होत आहे, असा दावा अजित पवार यांनी केला.

Supriya Sule-Ajit Pawar
Latur Lok Sabha Constituency : काँग्रेस भवनात विजयाच्या संकल्पाची गुढी उभारत अमित देशमुखांची चाय पे चर्चा...

पवारसाहेब आता बारामतीतील वाड्या-वस्त्यांवर फिरत आहेत. त्याचे खूप वाईट वाटते. पूर्वी त्यांची बारामतीत एकच तेही शेवटची सभा व्हायची. बारामतीकर आजपर्यंत पवार कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. आताही तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहाल, याची खात्री आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Edited By : Vijay Dudhale

R

Supriya Sule-Ajit Pawar
Sangli Lok Sabha 2024 : सांगली ठाकरेंच्या शिवसेनेकडेच; काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी तातडीने बोलावली बैठक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com