Lok Sabha elections Baramati constituency : बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीचा उमेदवार नक्की कोण असेल, यावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. या मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी अद्यापही निश्चित झालेली नाही. मात्र, असे असतानाही बारामती लोकसभा मतदारसंघात जोरदार बॅनरबाजी सुरू झाली आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार अशी लढाई होण्याची चिन्हे आहेत. पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला अशी ओळख बारामती मतदारसंघाची आहे. या मतदारसंघावर पवार कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्याबरोबर अजित पवार ( Ajit Pawar ) हे या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतात. यंदाच्या निवडणुकीसाठी अजून उमेदवाराची घोषणा होण्यापूर्वीच मोठी बॅनरबाजी सुरू झाली आहे. बारामती लोकसभा ( Baramati Loksabha ) मतदारसंघात समावेश असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातील वारजे भागात रविवारी पुणे महापालिकेच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांच्या नावाचे मोठे बॅनर्स जागोजागी लावण्यात आले होते. Lok Sabha elections Baramati constituency,
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बारामतीमध्येदेखील आता सुनेत्रा पवार यांचे मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. ' प्रत्येकाला मान आणि प्रत्येकाचीच जाण,' असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांची उमेदवारी आता निश्चित मानली जात आहे. त्यातच रविवारी झालेल्या कार्यक्रमांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बारामतीचा उमेदवार पुढील दोन ते तीन दिवसांतच ठरेल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या नावाने लावण्यात आलेल्या या बॅनर्सबाबत चर्चा रंगत आहेत.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) अनेक पदाधिकाऱ्यांकडून सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार म्हणून फ्लेक्स लावले होते. या फ्लेक्सची जोरदार चर्चादेखील रंगली होती. सुनेत्रा पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून बारामती मतदारसंघात जोरदार कार्यक्रम घेत प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. 'होम मिनिस्टर', 'महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम' यासह आरोग्य शिबिर तसेच सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावत सुनेत्रा पवार या दिवस रात्र कार्यरत आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरदेखील सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचे स्टेटस ठेवण्यास सुरुवात केली आहे.
बारामतीमध्ये लावण्यात आलेल्या या बॅनर्सवर 'एकच नीती, गतिमान बारामती' असेदेखील मचकूर लिहिण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध भागात लागलेले हे फ्लेक्स सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. पुढील दोन-चार दिवसांमध्येच महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होतील, त्यानंतर या मतदारसंघातील उमेदवाराचे अंतिम चित्र स्पष्ट होईल हे निश्चित आहे. या बॅनरच्या निमित्ताने सुनेत्रा पवार चांगल्याच अॅक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.