Pune News : नीलेश लंके आणि अमोल कोल्हेंमध्ये पक्ष प्रवेशाच्या चर्चा.. ?

Sharad Pawar शरद पवार यांनी नाकारला असलं तरी नीलेश लंके यांचा पक्ष प्रवेश ऐनवेळी कॅन्सल झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात असतानाच नीलेश लंके यांनी खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेऊन चर्चा केली.
Nilesh Lanke, Amol Kolhe
Nilesh Lanke, Amol Kolhesarkarnama
Published on
Updated on

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक असलेले आमदार नीलेश लंके हे गेल्या काही काळापासून शरद पवार यांच्या गटामध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आज नीलेश लंके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश होणार असल्याच्या बातम्यादेखील झाल्या. मात्र, त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये या सर्व बातम्या खोडून काढल्या.

पारनेरमधील नीलेश लंके प्रतिष्ठानने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवपुत्र संभाजी महाराज या महानाट्याचा प्रयोग नगरमध्ये घेतला. या महानाट्यातील अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ते सादर केले. या महानाट्याला नगरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महानाट्याच्या समारोपादिवशी खासदार कोल्हे यांनी दिल्लीत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची 'तुतारी' नगरमधून लोकनेत्यांनी वाजवावी, असे विधान करत आमदार नीलेश लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात येण्याचे निमंत्रण दिले.

यानंतर नीलेश लंके हे शरद पवार गटामध्ये सहभागी होणार असल्याच्या बातम्यांना शरद पवार गटांतील नेत्यांनी दुजोरा दिल्याचेदेखील पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीदेखील नगर दक्षिणमधील जनता शरद पवार यांच्या पाठीशी नेहमीच उभे राहिले असून, या वेळी ती तुतारी वाजवणार आहे. त्यामुळे नीलेश लंके हे शरद पवार गटामध्ये सामील होतील याचा आनंद असून, भविष्यात अनेक नेते पुन्हा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली परत येतील, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला आहे.

Nilesh Lanke, Amol Kolhe
Nilesh Lanke: शिवसैनिक ते राष्ट्रवादीचे आमदार असा आहे निलेश लंकेंचा राजकीय प्रवास

दरम्यान, आज सकाळी शरद पवार (Sharad Pawar) यांची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली. ही पत्रकार परिषद नेमकी कोणत्या विषयासंदर्भात असणार आहे. याबाबतचा खुलासा पक्षाकडून करण्यात आला नव्हता, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला नीलेश लंके यांचा पक्ष प्रवेश आजच होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात झाल्याच्या पाहायला मिळाल्या. मात्र, पत्रकार परिषदेदरम्यान शरद पवार यांनी या सगळ्या शक्यता नाकारत नीलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशाबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार यांनी नाकारलं असलं तरी नीलेश लंके यांचा पक्ष प्रवेश ऐनवेळी कॅन्सल झाला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच नीलेश लंके यांनी खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीमुळे आणि चर्चेमुळे पुन्हा एकदा नीलेश लंके चर्चेत आले असून, नीलेश लंके यांच्या भूमीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. नीलेश लंके हे महाविकास आघाडीमधून नगरचे लोकसभेचे उमेदवार होणार का हे पाहावे लागेल.

Edited By : Umesh Bambare

R

Nilesh Lanke, Amol Kolhe
Sujay Vikhe On Amol Kolhe: रिकाम्या जागा भरण्यासाठी अमोल कोल्हेंचे लंकेंना निंमत्रण | Nagar Politics

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com