ajit pawar sharad pawar sunetra pawar sarkarnama
पुणे

Sunetra Pawar : पवारांचं निवासस्थान असलेल्या ‘मोदी बागे’त सुनेत्रा पवार कोणाला भेटल्या? अजितदादा गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Sudesh Mitkar

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजित पवार ) खासदार सुनेत्रा पवार यांनी आज पुण्यात ‘मोदी बाग’ येथे जाऊन ज्येष्ठ नेते, शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली असल्याच्या चर्चा माध्यमांवर सुरू आहेत.

सोमवारी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’ येथे शरद पवारसाहेबांची भेट घेतली होती. त्यामुळे या भेटीगाठी नक्की कशासाठी, अशी चर्चां रंगली आहे. यातच भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी खुलासा केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) मंगळवारी सकाळीच ‘मोदी बाग’ येथे पोहोचल्या. यावेळी ‘मोदी बागे’त शरद पवारसाहेब आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, असं सांगितलं जातं. सुनेत्रा पवार तब्बल सव्वा तास ‘मोदी बाग’ येथे होत्या. या काळात सुनेत्रा पवार यांनी नेमकी कोणाची भेट घेतली? काय चर्चा झाली? याबाबत वेगवेगळ तर्कवितर्क लावण्यात येत होते.

याबद्दल सूरज चव्हाण म्हणाले, “सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या भगिनी यांना भेटण्यासाठी ‘मोदी बागे’त गेल्या होत्या. याच ‘मोदी बागे’त शरद पवारसाहेबांचे ( Sharad Pawar ) देखील निवासस्थान आहे. माध्यमांत वेगवेगळ्या बातम्या चालत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. या बातम्या थांबवण्यात याव्या, ही विनंती करतो.”

याप्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार ) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही भाष्य केलं आहे. “सुनेत्रा पवार यांच्या ‘मोदी बाग’ येथील भेटीबाबत मला काहीही माहिती नाही. मी माहिती घेऊन बोलेल. ही कौटुंबिक भेट सुद्धा असू शकते. पवारसाहेबांची प्रकृती ठीक नाही. राज्यात काहीही वेगळं चालेलं नाही. महायुतीत सत्तेत येणार हे नक्की,” असा विश्वास सुनील तटकरेंनी व्यक्त केला.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT