Assembly Election 2024 : कोथरूड अन् वडगाव शेरीत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष नाराजांवर टाकणार डाव?

Ncp Sharad Pawar : वडगाव शेरीसोबतच कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील शरद पवार गटानं चाचपणी सुरू केली आहे. पण...
_sharad pawar .jpg
_sharad pawar .jpgsarkarnama
Published on
Updated on

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ( Assembly Election ) महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून पुणे शहरातील आठ जागांपैकी सहा जागांवरती दावा सांगण्यात आला आहे. यामध्ये वडगाव शेरी, हडपसर, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, खडकवासला, कोथरूड आणि पर्वती विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ( Ncp ) एक संघ असताना पुण्यातील दोन जागा जिंकण्यात यश आलं होतं. हडपसर आणि वडगाव शेरी या दोन मतदारसंघांमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. मात्र, हे दोन्ही आमदार अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे जागा वाटपात या दोन्ही मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा प्रबळ दावा असणार आहे.

_sharad pawar .jpg
Ajit Pawar News : अजित पवारांचे ठरले; काही झाले तरीही महायुतीतच राहणार

हडपसर विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास या मतदारसंघामधून शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे इच्छुक असून त्यांच्या उमेदवारीसाठीचा दावा जास्त प्रबळ मानला जात आहे. तर, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार ( Sharad Pawar ) गटाकडे तितका प्रबळ, असा दावेदार सध्या तरी पाहायला मिळत नाही. दुसरीकडे महायुतीमध्ये तुल्यबळ, असे दावेदार पाहायला मिळत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सध्याचे आमदार सुनील टिंगरे हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, असं बोलले जात आहे. भाजपमध्ये माजी आमदार जगदीश मुळीक आणि बापू पठारे, माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांच्यासारखे कसलेले उमेदवार आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून 'फिल्डिंग' लावून तयार आहेत. यातील एखादा नाराज उमेदवाराला सोबत घेऊन हा मतदारसंघ सर करता येईल का? याची चाचपणी सध्या शरद पवार गटाकडून सुरू आहे.

_sharad pawar .jpg
Sakal Survey 2024: दोन्ही राष्ट्रवादीसाठी विधानसभा निवडणूक अस्तित्वाची लढाई; पुन्हा आमने-सामने...

वडगाव शेरीसोबतच कोथरूड विधानसभा मतदारसंघात देखील शरद पवार गटानं चाचपणी सुरू केली आहे. हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून शरद पवार गट उमेदवाराची चाचपणी करत आहे. भाजपला शह देण्यासाठी त्यांच्यातीलच काही नाराज आपल्याकडे वळवण्याची खेळी आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ शकते, असं चित्र सध्या दिसत आहे. याची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांना देण्यात आल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com