Sharad Pawar’s image displayed on a banner during Sunetra Pawar’s NCP gathering, drawing political attention. sarkarnama
पुणे

Sharad Pawar Banner : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात नरेंद्र मोदी,अमित शहांच्या शेजारी शरद पवारांचा फोटो! नवीन राजकीय समीकरण?

Sunetra Pawar NCP Rally : सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात आपल्या भावना व्यक्त केला. या मेळाव्यात व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो होता.

Roshan More

NCP Rally : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राष्ट्रवादीमधील नेत्यांनी आणि सुनेत्रा पवारांनी मार्गदर्शन केले. मात्र, या मेळाव्यात लावण्यात स्टेजवर लावण्यात आलेला बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघ महायुती उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप शिवसेना आरपीआय-आठवले गट यांची नावे या बॅनरवर होती. तसेच महायुतीमधील राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांचे फोटो या बॅनरवर होते. महायुतीचा भाग नसणाऱ्या शरद पवार यांचाही फोटो या बॅनरवर असल्याने अनेकांना धक्का बसला.

बॅनरवर सर्वात मोठा फोटो हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होता. त्यानंतर त्यांच्या शेजारी गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो आहे. शहांच्या शेजारी शरद पवाराचा फोटो होता. त्यामुळे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो महायुतीच्या बॅनरवर असल्याने वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहे.

सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या मैदानात असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आपली भूमिका जाहीर करत ही निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय जाहीर केला होता. पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, काँग्रेसने आपला उमेदवार दिला आहे.

सुनेत्रा पवार भावूक

सुनेत्रा पवार या मेळाव्यात मार्गदर्शन करताना भावूक झाल्या. त्यांनी सांगितले की, फक्त जय आणि पार्थ माझा परिवार नाही तर संपूर्ण बारामतीकर माझा परिवार आहे. अजितदादांच्या जाण्याने कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. पण मी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा शब्द देखील त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT