Baramati By Election : सुनेत्रा पवारासांठी छगन भुजबळ मैदानात ; शेवटच्या क्षणापर्यंत विरोधकांना करणार विनंती, बारामतीत घडामोडींना वेग..

Chhagan Bhujbal On Baramati by election : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसने आपला उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बिनविरोधसाठी पेच निर्माण झाला आहे.
Sunetra Pawar, Supriya Sule & Chhagan Bhujbal
Sunetra Pawar, Supriya Sule & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Sunetra Pawar Baramati By Election : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली असून, आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.

सत्ताधारी महायुतीकडून दिवंगत नेते अजित पवार यांच्या पत्नी व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका महायुतीने घेतली आहे. मात्र, काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केल्याने पेच निर्माण झाला असून निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे मैदानात उतरले आहेत. बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीचे नेते आजही प्रयत्नशील असून, शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही विनंती करणार, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

Sunetra Pawar, Supriya Sule & Chhagan Bhujbal
Sunetra Pawar Baramati : ताफा थांबला, सुनेत्रा पवार उतरल्या अन्...; अर्ज भरण्यापूर्वी बारामतीत नक्की काय घडलं?

शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवारांविरुद्ध उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही सामंजस्याची भूमिका घेत अर्ज दाखल करणार नसल्याचे सांगितले आहे. पण काँग्रेसने मात्र अ‍ॅड. आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही निवडणुकीत उडी घेण्याचे संकेत दिले होते त्यामुळेही पेच निर्माण झाला होता.

दरम्यान यासंदर्भात छगन भुजबळ यांनी लक्ष्मण हाके यांचीही समजूत काढण्यात आली आहे. तसेच लवकरच काँग्रेससोबत चर्चा करु, शेवटपर्यंत विनंती करु असे म्हटले आहे. प्रत्येकाचे पक्ष वेगळे असले तरी लोकशाहीत विनंती करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत विरोधकांना विनंती करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Sunetra Pawar, Supriya Sule & Chhagan Bhujbal
Baramati By-Election 2026 : अखेर लक्ष्मण हाकेंनी निर्णय घेतलाच; बारामतीत पवारांना भिडणार, पण उमेदवारी कोणत्या पक्षाची? स्वत:च सांगितलं...

दरम्यान यासंदर्भात राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांशीही बोलण्याचे प्रयत्न झाले. छगन भुजबळ यांनी सांगितले की, कॉंग्रसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, तसेच जयराम रमेश यांच्याशीही सकारात्मक चर्चा झाली. तसेच स्वतः वळसे पाटील आणि मी शरद पवार यांच्या देखील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी आम्ही उमेदवार देणार नाही, हे आधीच जाहीर केले होते, असे सांगितल्याचे छगन भुजबळ म्हणाले. सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरे यांनाही फोन केला होता अशी माहिती भुजबळांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com