Sunetra Pawar Sarkarnama
पुणे

Sunetra Pawar : नाव अजितदादांचं अन् नाराजी कुटुंबावर, हे कसलं समीकरण? सुनेत्रा पवारांचा विरोधकांना सूचक सवाल

Someshwar Sugar Factory Election : स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवावी. दादांच्या नेतृत्वाचा आधार घेण्याचा प्रयत्न करू नये, असा थेट इशारा सुनेत्रा पवारांनी विरोधकांना दिला.

Roshan More

चिंतामणी क्षीरसागर

Sunetra Pawar News : स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असेल तर अजितदादांचे नाव वापरणे बंद करा. अजितदादांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयावर नाराज होऊन बाहेर पडले असतील, तर त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवावी. दादांच्या नेतृत्वाचा आधार घेण्याचा प्रयत्न करू नये. ‘नाव दादांचं आणि नाराजी कुटुंबावर, हे कसलं समीकरण?’ असा सवाल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विरोधकांचे नाव न घेता केला.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ सोमेश्वर मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. त्यानंतर झालेल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बोलत होत्या. त्यांनी ‘सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पवार पॅनल’च्या उमेदवारांना विजयी करण्याची विनंती सभासदांना केली.

पवार म्हणाल्या, ‘‘सभासदांनी आपल्या मतदानाच्या माध्यमातून निवडून दिलेले संचालकच कारखान्याचा चेअरमन ठरवतील. होणारा चेअरमन केवळ नाव गाजवणारा नसून भाव गाजवणारा असेल. माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपण दिलेले सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी करा.’’

सभासदांच्या हिताला प्राधान्य

उमेदवारी निवडीच्या प्रक्रिये बाबत बोलताना त्या म्हणाल्या पक्षाच्या पद्धतीप्रमाणे सर्वांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यानंतर निरीक्षक नेमण्यात आले सर्वांच्या भावना आणि मतांचा विचार करून सर्वसमावेशक संचालक मंडळ तयार करण्यात आले आहे सहकारात सर्वांना बरोबर घेऊन चालणे म्हणजे सहकार माझी एकट्याचे ऐका असे सहकारात चालत नाही असे सांगून कारखान्याच्या विकासासाठी सभासदांच्या हिताला प्राधान्य देत काम करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष तानाजी बांदल यांनी केले. जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर यांनी पक्षाची भूमिका मांडत पॅनलच्या उमेदवारांची सभासदांना ओळख करून दिली. यावेळी पॅनलचे सर्व उमेदवार, फलटणचे आमदार सचिन पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे प्रमोद काकडे राजवर्धन शिंदे जिल्हा परिषद सदस्य रोहिणी कदम ढोले पंचायत समिती सदस्य जितेंद्र पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कारखान्याचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, सोमेश्वर मंदिरात दर्शन घेऊन नारळ फोडत प्रचाराचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT