Satara Dcc Bank Election : सातारा DCC बॅंकेसाठी उदयनराजे, संजीवराजेंसह सहा जणांनी भरले अर्ज; पहिल्याच दिवशी भाजप नेत्यांना दिला हा सबुरीचा सल्ला

Udayanraje and Sanjeevraje, Filed Nomination : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. 01 नोव्हेंबरला मतदान होणार असून पहिल्याच दिवशी उदयनराजे भोसले यांच्यासह सहा नेत्यांनी अर्ज भरले.
sanjeevraje naik nimbalkar-udayanraje bhosale
Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara, 26 September : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या 21जागांची निवडणूक जाहीर झाली असून येत्या 01 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 25 सप्टेंबर रोजी खासदार उदयनराजे भोसले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर, सुरभी भोसले यांच्यासह 06 प्रमुख नेत्यांनी आपले अर्ज भरले आहेत.

खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी गृहनिर्माण संस्था मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी प्रमुख नेतेमंडळींना सबुरीचा सल्लाही दिला आहे.

सहकार क्षेत्रातील राजकारणावर खासदार उदयनराजे भोसले यांनी रोखठोक भाष्य केले. सातारा जिल्हा बॅंकेत राजकारण आणू नका. ज्या जिल्हा बँकांमध्ये अवाजवी राजकारण शिरले आहे, त्या बॅंका मोडकळीस निघाल्याचे वास्तवही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

शेतकरी, सर्वसामान्य आणि कष्टकऱ्यांच्या हितासाठी सातारा जिल्हा बॅंकेची स्थापना झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हिताठी बॅंका टिकवणे हीच सर्वांची प्राथमिकता असायला हवी. त्यासाठी सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून काम केले पाहिजे, असा सल्लाही उदयनराजे भोसले यांनी दिला.

sanjeevraje naik nimbalkar-udayanraje bhosale
Aditya Thackeray On Omraje : आदित्य ठाकरेंनी ओमराजेंच्या चॅलेंजचा विषय तीनच वाक्यात संपवला; म्हणाले, ‘पळपुटे, फालतू गोष्टी...’

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत महायुतीमधील तीन पक्षांमध्येच जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. विशेषतः भाजपने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर निवडणूक लढवून बॅंक ताब्यात घेण्याच्या प्रयत्न चालवला आहे. मात्र, उदयनराजेंच्या या विधानाने भाजपच्या नेत्यांच्या महत्वकांक्षेला मुरड घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

sanjeevraje naik nimbalkar-udayanraje bhosale
Gokul election : 'गोकुळ'वर मुश्रीफांचाच 'पावर गेम'! यड्रावकरांची राष्ट्रवादीकडून लॉटरी; भाजप तिसऱ्या स्थानावर!

निवडणूक चिन्हांच्या मागणीबाबत विचारले असता, लोकांच्या हक्कासाठी शिट्टी वाजवणार, सावली देण्यासाठी छत्री आणि प्रेमाने चहा पाजण्यासाठी कपबशी वापरू, अशी नेहमीच्या मिश्किल शैलीत उदयनराजे भोसले यांनी टोलेबाजी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com