Someshwar Sugar Factory Election : बारामतीत राजकीय वातावरण तापले; भाजपने ताकद लावलेल्या निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाची एन्ट्री? युगेंद्र पवारांनी दिले मोठे संकेत

Yugendra Pawar Signals Over Someshwar Sugar Factory Election : बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली असून आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.
Someshwar Sugar Factory Election; Yugendra Pawar
Someshwar Sugar Factory Election; Yugendra Pawarsarkarnama
Published on
Updated on

Pune News : बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर होताच तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. या निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत युवा नेते युगेंद्र पवार यांनी दिले आहेत. निंबूत येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या प्राथमिक संवाद मेळाव्यात त्यांनी ही माहिती दिली असून, पुढील आठवड्यात पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.

निवडणुकीचे वेळापत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर पक्षातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सभासदांच्या भावना जाणून घेण्यासाठी निंबूत येथे बुधवारी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत बहुतांश कार्यकर्त्यांनी आणि सभासदांनी कारखान्याची निवडणूक पक्षाने पूर्ण ताकदीने लढवावी, अशी एकमुखी मागणी लावून धरली.

सावध पावले आणि रणनीती

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, "तीन दिवसांपूर्वीच सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यामुळे सभासद आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा काय आहेत, हे समजून घेणे आवश्यक होते. आजची बैठक ही केवळ प्राथमिक चर्चा आणि मते जाणून घेण्यासाठी होती. कार्यकर्त्यांचा कौल लक्षात घेऊन पुढील आठवड्यात रणनीती आणि पक्षाची अंतिम भूमिका जाहीर केली जाईल."

Someshwar Sugar Factory Election; Yugendra Pawar
Ganesh Sugar Factory: सुजय विखेंची तडकाफडकी मोठी घोषणा; म्हणाले, 'आम्ही गणेश साखर कारखान्याची निवडणूक पुन्हा लढवणार नाही..'

​सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून ताकद लावली जाणार असल्याची चर्चा आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये युती अथवा आघाडीची शक्यता, याबाबत विचारले असता युगेंद्र पवार यांनी सावध भूमिका घेतली.

​"सध्या ही केवळ सुरुवातीची चर्चा आहे. आजची बैठक ही पहिलीच बैठक होती. प्रमुख कार्यकर्ते आणि सभासदांची मते जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीला कोणत्या पद्धतीने सामोरे जायचे, तसेच पुढील रणनीती काय असणार, याबाबतचा अंतिम निर्णय पुढील आठवडाभरात घेतला जाईल," असे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.

Someshwar Sugar Factory Election; Yugendra Pawar
Krishna Sugar Factory Result : ‘कृष्णा’च्या निवडणुकीत भोसलेंच्या विजयाची हॅट्‌ट्रीक : पृथ्वीराजबाबा, शिंदेंनी पाठिंबा दिलेल्या मोहिते गटाचा धुव्वा

दुसरीकडे, राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची या निवडणुकीबाबतची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे भाजप स्वतंत्र ताकद लावणार की महायुती म्हणून एकत्र लढणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com