Sunil Shelke-Sunetra Pawar Sarkarnama
पुणे

NCP Merger : राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत सुनील शेळकेंचं मोठं विधान; ‘सुनेत्रावहिनींचं नेतृत्व मान्य नसेल ते बाहेरचा रस्ता...’

Sunil Shelke Statement : सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू केली. अजूनही एकत्र येण्याची संधी असल्याचे सांगत महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडींचे संकेत दिले.

Sudesh Mitkar

Pune, 29 March : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू केली होती. त्यानंतर दादांचा विमान अपघातात आकस्मिक मृत्यू झाला आणि या चर्चेने जोर धरला. मात्र, ती केवळ चर्चाच राहिली आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी सकारात्मक पाऊल उचललं न गेल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी आता पुन्हा एकदा या चर्चेला सुरुवात केली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणे शक्य असल्याचं सांगत अजूनही वेळ गेलेली नाही, असा दावा आमदार सुनील शेळके यांनी केला आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कारभार हाती घेतला आहे. मात्र पक्षातील काही नेत्यांच्या विवादास्पद कारनाम्यांमुळे त्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत.

रुपाली चाकणकर आणि नरहरी झिरवाळ हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यामुळे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती काय आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये एकीकरणाची चर्चा जोर धरू लागली आहे.

याबाबत सुनील शेळके म्हणाले, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व जर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना मान्य असेल आणि दोन्ही पक्ष एकत्र आले तर आम्हाला त्याबाबत अभिमानच असेल. आमचा पक्ष मोठा होत असेल तर त्याबाबत सर्वांनी सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक असल्याचंही शेळके म्हणाले.

ज्यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व ज्यांना मान्य नसेल, ते इतर पक्षांमध्ये प्रवेश करतील. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येत असतील, तर त्याचा मला आनंद आहे,असेही आमदार शेळके यांनी सांगितले.

अजितदादांची उणीव भासतेय...

सध्या कामकाज करताना अजितदादांची उणीव खूप भासत आहे. दादांच्या उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवार यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद देऊन सन्मान मिळायला हवा, अशी भूमिका वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व स्वीकारून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील, तर आनंदच आहे, अशा भावना आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT