NCP Politics : चाकणकरांच्या राजीनाम्याने पाच महिला नेत्यांची नावांची चर्चा, सुनेत्रा पवार देणार प्रदेशाध्यक्षपदी संधी?

NCP Women State President : रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर राष्ट्रवादीतील पाच महिला नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
Sunetra Pawar
Sunetra Pawarsarkarnama
Published on
Updated on

NCP News : अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशध्यक्षपदाजा राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर यांनी गुरुवारी रात्री आपल्या राजीनाम्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली. चाकणकरांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशध्यक्षपदी कोणची निवड होणार याची चर्चा सुरू झाली आहे.

'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार पाच महिला नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये सना मलिक, सरोज अहिरे, वैशाली नागवाडे, राजलक्ष्मी भोसले आणि प्रतिभा शिंदे यांची नावे आघाडीवर आहेत.

या पाच नेत्यांपैकी एका महिला नेत्याची निवड ही राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता आहे. महिला नेत्याचे नाव निश्चित झाल्यानंतर त्यावर अंतिन निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या घेतील.

चाकणकर काय म्हणाल्या?

चाकणकर यांनी राजीनामा देताना सोशल मीडियावर पोस्ट करताना म्हटले होते की, खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे.त्याच्या आर्थिक व्यवहारात,त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही,आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे.तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे,असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत,ते वेदनादायक आहे.सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच. हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा,ही माझी मागणी मी यापूर्वीच मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री,मा.पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे.

Sunetra Pawar
Rupali Chakankar News: महापालिका निवडणुकीत पराभव ते महिला आयोगाच्या अध्यक्षा; अशी आहे रुपाली चाकणकरांची राजकीय कुंडली

राजीनामा नव्हे हकालपट्टी

रुपाली चाकणकर यांनी गुरुवारी रात्री आपला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, हा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा नाही गच्छंती आहे. दरम्यान, यापूर्वी चाकणकर यांना अशोक खरात प्रकरणात सहआरोपी करत अटक करण्याची मागणी देखील त्यांनी केली होती.

Sunetra Pawar
Women Commission: चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोगाची धुरा कुणाकडे? अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतील अनेकांनी लावली 'फिल्डिंग'! 'या' चार नावांची चर्चा जोरात!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com