

Beed, 29 March : भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज (29 मार्च) बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून मोठी घोषणा केली आहे. भविष्याच्या योजनेप्रमाणे बीड जिल्ह्यात सहाही आमदार आणि खासदार हा भारतीय जनता पक्षाचा असावा, यासाठीच्या रणनीतीची सुरुवात आम्ही आज योगेश्वरी देवीच्या साक्षीने करत आहोत, असे मंत्री मुंडे यांनी म्हटले आहे.
मंत्री पंकजा मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाचे अंबाजोगाई येथे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना पंकजा मुंडेंनी बीड (Beed)जिल्ह्यात शतप्रतिशत भाजप करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे महायुतीमधील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिल्याचे मानले जात आहे.
पंकजाताई आल्या तर आमचं काय, अशी भीती माझ्याबाबत असेल तर त्या दिवशी राजकारण संपून जाईल. पण ताई नसतील तर आमचं काय, हे महत्वाचं आहे. त्या वेळी आम्ही भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार निवडून आणले होते. आता तर म्हणते आम्ही सहाला सहा आणले आहेत. आमची सध्या खिचडी आहे, युती आहे. एवढी माझ्यावर ईश्वराची कृपा आहे. माझं स्वप्न तुमच्यासाठी, गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नासाठी आहे, असेही पंकजा मुंडे (Pankaja Munde ) यांनी स्पष्ट केले.
त्या म्हणाल्या, भविष्याच्या योजनेप्रमाणे बीड जिल्ह्यात सहाही आमदार आणि खासदार हा भारतीय जनता पक्षाचा असावा, यासाठीच्या रणनीतीची सुरुवात आम्ही आज योगेश्वरी देवीच्या साक्षीने करत आहोत. यश येईल, अपयश येईल, हे तुमच्यावर आणि ईश्वरावर अवलंबून आहे. पण माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजपासून मी सुरुवात करत आहे.
मी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरुवात केली तर माझं स्वप्न पूर्ण झालं नाही, असा अनुभव मला आजपर्यंत कधीही आलेला नाही, असे सांगून पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना एक रोड मॅप दिल्याचे मानले जात आहे. या घोषणेमुळे मात्र महायुतीमध्ये भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनाही एक प्रकारचा हा इशारा असल्याचे मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.