Pune Sarkarnama
पुणे

Shinde vs Thackeray camp : शिंदे-ठाकरे गटाचे समर्थक आमनेसामने; जोरदार घोषणाबाजीने राडा

सरकारनामा ब्युरो

Pune News : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघालेले आहे. मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी शिंदे गटाकडून जल्लोष करण्यात येत आहे. तर ठाकरे गटाकडून हा निर्णय दबावातून झाल्याचा आरोप होत आहे. पुण्यात शिंदे-ठाकरे गटाचे समर्थक एकमेकांसमोर आल्याने प्रचंड गदारोळ झाला. यात महिला कार्यकर्त्यांचीही झटापट झाल्याची माहिती आहे. दरम्यान दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या निर्णयाचे भाजपने (BJP) स्वागत केले आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने (NCP) हा निर्णय अनपेक्षित असल्याचे म्हटले आहे. या निर्णयाचे पुण्यातील शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री फटाके फोडून, पेढे वाटून स्वागत केले होते. तर ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय हा राजकीय दबावातून झाल्याचा आरोप केला आहे.

आज पुण्यातील पुण्यात नवी पेठ येथे शिंदे आणि ठाकरे गटाचे समर्थकांनी राडा घातला. येथे एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकत्र आले होते. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यामुळे बाळासाहेबांची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

पुण्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे शहराध्यक्ष संजय मोरे, गजानन थरकुडे, तसेच बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून शहर प्रमुख नाना भानगिरे यावेळी उपस्थितीत होते. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान काहीच वेळातच तेथे पोलिसांनी धाव घेतली. त्यांनी दोन्ही गटांना शांत राहण्याचे आवाहन करून परिस्थिती आटोक्यात आणली.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात आहेत. त्यातच झालेल्या या राड्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. येथील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली. तसेच तेथे पोलीस उपायुक्तानीही भेट दिली. त्यानंतर येथील स्थिती आटोक्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT