Supriya Sule Sarkarnama
पुणे

Akshay Shinde Encounter : '...तर पहिला पेढा मी मुख्यमंत्र्यांना दिला असता'; खासदार सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

Akshay Shinde would have been hanged while CM Eknath Shinde was praised by Supriya Sule : बदलापूर प्रकरणातील आरोपीविरुद्ध खटला चालवून जलदगतीने शिक्षा दिली असती, तर मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले असते, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

Pradeep Pendhare

Pune News : खासदार सुप्रिया सुळे यांनी बदलापूर बाललैगिंक प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेविरुद्धच्या एन्काऊंटरवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

"या एन्काऊंटरची चौकशी व्हायला हवी. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून भर चौकात आरोपीला फाशी द्यायला हवी होती. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी पहिला पेढा मी दिला असता", अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला फटकारलं.

खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पार्टी शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी महायुती सरकारच्या एन्काऊंटरपद्धतीवर शंका उपस्थित केली. महाराष्ट्रात कधी एन्काऊंटर हा शब्द कधी ऐकला नव्हता. या एन्काऊंटरमुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेत आणि ते गंभीर आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, "बदलापूर प्रकरणातील आरोपीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्याचे दोन्ही हात बांधलेले दिसतात. तसेच त्याच्या चेहऱ्यावर काळे कापड देखील बांधले आहे. असे असताना आरोपीने पोलिसांची बंदूक हिसकवली कशी? असा प्रश्न त्यातून निर्माण होतो. या एन्काऊंटरने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणाची वेळेत एफआयआर झाली नव्हती". ती का झाली नाही याची देखील चौकशी व्हायला हवी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

फसवणूक करणारं सरकार

'राज्यामध्ये महागाई, बेरोजगारी, आरक्षणाचे प्रश्न या सगळ्यांवर राज्य सरकारला उत्तरे द्यावी लागणार आहेत. हे सरकार सध्या 'पॅनिक मोड'मध्ये आहे. त्यामुळे आपण गतिमान आहोत हे दाखवण्यासाठी वेगवेगळे निर्णय झटपट घेण्याची घाई करत आहे. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम या सर्व समाजाची फसवणूक या सरकारने केली आहे. राज्यातील सध्याच्या अराजकतेला हे ट्रिपल इंजिनचे खोके सरकार जबाबदार आहे', अशा तीव्र शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

फडणवीस गृहमंत्री झाल्यावर गुन्हेगारी वाढते

बदलापूर बाललैगिंक अत्याचाराचा खटला हा जलदगती न्यायालयात चालवायला पाहिजे होता. न्यायालयाने त्याला शिक्षा सुनवायला पाहिजे होती. त्याला भरचौकात फाशी द्यायला हवी होती. यातून समाजामध्ये चागंला संदेश गेला असता. पण या एन्काऊंटरने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा गृहमंत्री होतात, तेव्हा महाराष्ट्रातील गुन्हेगारीमध्ये वाढ होते, हा मीडिया रिपोर्ट आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT