Sanjay Raut : 'खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाबाबत संजय राऊतांचं मोठं विधान ; पदाधिकाऱ्यांना म्हणाले...

Khed-Alandi Assembly Constituency खेड तालुक्यातील शिवसेना(ठाकरे गट) पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी खासदार संजय राऊतांची मुंबईत जाऊन घेतली भेट.
Sanjay Raut
Sanjay RautSarkaranama
Published on
Updated on

Shivsena(UBT) on Vidhan Sabaha Election : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली असून जास्तीत जास्त आपल्या जागा वाढवण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडून मतदारसंघांवर दावे सांगितले जाते आहेत.

याच दरम्यान आता पुण्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने(ठाकरे गट) एकप्रकारे दावा सांगितल्याचे समोर आले आहे. खासदार संजय राऊत यांनीही महाविकास आघाडीत हा मतदारसंघ आपल्याच पक्षाच्या वाट्याला येणार असल्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

खेड तालुक्यातील शिवसेना(ठाकरे गट) पदाधिकारी खासदार संजय राऊत यांना भेटले. खेड -आळंदी विधानसभेची जागा ही महाविकास आघाडीत ठाकरे गटालाच मिळावी अशी आग्रही मागणी त्यांनी पक्षाकडे केली. यावेळी खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी महाविकास आघाडीत ही जागा मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत आणि शिवसेनेलाच(ठाकरे गट) खेडची जागा मिळेल असे खासदार संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले.

Sanjay Raut
Ajit Pawar Vs Vikhe Patil : अजित पवार अन्‌ विखे पाटील यांच्यात खडाजंगी; अर्थमंत्री म्हणाले ‘निधी आणायचा कोठून...’

खेड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी संजय राऊतांना सांगितले की, खेड- आळंदी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी महत्त्वाचा आहे. हा मतदारसंघ शिवसेनेला(Shivsena) मिळाल्यास उमेदवार विजयी होवू शकतो. खेड तालुक्यात शिवसेनेची ताकद आहे त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळावी असे पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे मत आहे.

एवढंच नाहीतर पक्षातील कोणालाही उमेदवारी मिळाली तर इतर इच्छुक असणारे अन्यसर्वजण त्या उमेदवाराचे काम करतील व शिवसेनेचा उमेदवार खेड तालुक्यात विजयी होईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड,तालुका प्रमुख रामदास धनवटे, अमोल पवार,बाबाजी काळे शिवाजी वर्पे , रामहरी आवटे,सुदाम बोत्रे, राहुल मलघे आदी उपस्थित होते.

Sanjay Raut
Abdul Sattar News : `लाडकी बहीण` आम्हाला पुन्हा सत्तेवर आणेल

एकीकडे खेड तालुक्यातील शिवसेने(ठाकर गट)पदाधिकारी या मतदारसंघासाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतीलच त्यांचा मित्र असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार(Sharad Pawar) पक्षाने ही जागा आम्हाला मिळावी, आम्ही लढणार आहोत. असं म्हटल्याचं बोललं जात आहे.

कारण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडेही इच्छुक उमेदवार बरेच आहेत. तेही निवडणूक लढविण्यासाठी सज्ज आहेत . पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे बालेकिल्ल्यातील ही जागा त्यांच्याकडेच जाईल अशाही चर्चा रंगत आहे. त्यामुळे नक्की जागा कोणाला मिळणार हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com