Supriya Sule Sarkarnama
पुणे

Supriya Sule News : 'मुख्यमंत्री निवडीसाठी दोन आठवडे अन् अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार नाही, हे...' ; सुप्रिया सुळेंनी लगावला टोला!

Supriya Sule on Mahayuti Goverment : जाणून घ्या, नव्या मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून अथवा फोन करून का नाही दिल्यात त्यांनी शुभेच्छा?

Sudesh Mitkar

Supriya Sule Pune Press News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर आता राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ देखील घेतली आहे. यानंतर सर्व स्तरातील लोकांकडून शुभेच्छांचा वर्षाव या तिन्ही नेत्यांवर होताना पाहायला मिळत आहे.

विरोधी पक्षातील नेते देखील प्रत्यक्ष भेटून, फोनवर अथवा सोशल मीडियाच्या माध्यमातून या नेत्यांना शुभेच्छा देत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी फोन अथवा प्रत्यक्ष भेटून आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या नसल्याचं सांगितला आहे. यासाठी त्यांनी कारण सांगितलं आहे.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सुप्रिया सुळे म्हणल्या, राज्यात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर देखील सत्ता स्थापनेला उशीर झाला याचं मला आश्चर्य वाटलं. कारण यापूर्वी जेव्हा भाजप(BJP) सत्तेत आलं होतं तेव्हा ते अत्यंत अ‍ॅग्रेसिव्हपणे लवकर शपथविधी उरकून कामाला लागण्याच्या भूमिकेत होता. मात्र यंदा एवढ्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य महायुतीला मिळून देखील दोन आठवडे मुख्यमंत्री निवडीसाठी जातात आणि अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. हे दुर्दैवी असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

राज्याच्या नव्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना फोन अथवा प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्यात का? असा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की शपथविधी सुरू असताना मी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना प्रत्यक्ष कॉल अथवा भेटले नाही कारण त्यांना एवढं मोठं राज्य चालवायचा आहे. विविध विभाग त्यांना सांभाळायचे असतील ते व्यस्त असतील असं खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

राज्यातील विरोधी पक्षनेता पदाबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 2019 ला केंद्रामध्ये विरोधी पक्ष नेता नव्हता. मात्र 1980 च्या निवडणुकांमध्ये संख्याबळ नसताना देखील काँग्रेसने(Congress) दिलदारपणा दाखवत महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता दिला होता मात्र आता हे सरकार काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe )

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT