Assemblly Election : नशिबानं दगा दिला अन् विधानसभेला राजकीय वारं फिरलं; आता 'या' संधीसाधूंचं पुन्हा 'पीछे मूड'..!

Political News : या निवडणुकीतील हे बदलते वारे पाहता विधानसभेला फटका बसलेल्या माजी आमदारांनी आता वेगळा पर्याय शोधायला सुरवात केली आहे.
Ajit Pawar, Eknath shinde, Devendra fadnavis, Uddhav thackeray, Sharad Pawar, Nana Patole
Ajit Pawar, Eknath shinde, Devendra fadnavis, Uddhav thackeray, Sharad Pawar, Nana Patole Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीतील पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. या निवडणुकीतील पराभवाचे साईड इफेक्ट आता मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहेत. या निवडणुकीतील हे बदलते वारे पाहता विधानसभेला फटका बसलेल्या माजी आमदारांनी आता वेगळा पर्याय शोधायला सुरवात केली आहे. त्यामुळे या मंडळींचे आपसूकच पावले ही सत्ताधारी पक्षाकडे ओढत आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली होती. त्यामुळे अनेकाने महायुतीसोडून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीत प्रवेश केला होता. लोकसभेचे निकाल पाहून आता राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल, असा त्यांचा अंदाज होता. मात्र, विधानसभा निवडणुकीचे निकाल उलटेच लागले. या निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) मोठे बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. या कारणामुळे पराभूत झालेली नेतेमंडळी पुन्हा एकदा सत्ताधारी महायुतीच्या मार्गावर येताना दिसत आहेत. महायुतीला स्पष्ट बहुमत असल्याने येत्या पाच वर्षात बदल होण्याची शक्यता नसल्याने धाकधूक वाढलेली ही मंडळी पुन्हा परतीच्या वाटेवर आहे.

Ajit Pawar, Eknath shinde, Devendra fadnavis, Uddhav thackeray, Sharad Pawar, Nana Patole
Ruturaj Kshirsagar : 'ती' शपथ झाली पूर्ण, आमदार पुत्राने तब्बल पाच वर्षांनी डोक्यावर चढवला फेटा

विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला. त्यातच केंद्रातही महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे मविआकडे जाऊन पराभूत झालेले अनेकजण परत महायुतीसोबत जाऊन सत्तेसोबत येण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. त्यामध्ये जळगावमधील शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या संपर्कात आहेत. त्यासोबतच नुकतेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षात जाऊन निवडणूक लढवलेले इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, छत्रपती संभाजीनगरचे राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण, नांदेडमधील काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे हे महायुतीच्या नेत्याच्या संपर्कात आहेत. काही नेते मंडळीनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. तर उद्धव ठाकरे सेनेतील अनेक जण एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे समजते.

Ajit Pawar, Eknath shinde, Devendra fadnavis, Uddhav thackeray, Sharad Pawar, Nana Patole
CM Devendra Fadnavis News : चंद्रकांत खैरेंनी धरले मुख्यमंत्री फडणवीसांचे बोट

राजकारण हे सत्तेसाठीच असते. अजित पवार सत्तेत राहण्यासाठीच महायुतीमध्ये सहभागी झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी काही इच्छुकांना आपल्यासोबत थांबा, अशी विनंती केली होती, पण त्यांनी नकार दिला होता. तीच मंडळी पुन्हा त्यांच्या पाठीमागे लागली आहे. दुसरीकडे फडणवीस, बावनकुळे यांनीही भाजप सोडणाऱ्यांना थांबण्याच्या सूचना दिल्या होत्या. काही जणांनी ते मनावर घेतले नाही. पक्षांतर केलेल्या या मंडळींना पराभवाचा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे काही जण विजयी झाले असले तरी त्यांना राज्य आणि केंद्रातील सत्तेचा लाभ हवा आहे. त्यामुळे त्यांची पावले पुन्हा सत्ताधारी पक्षाकडे वळत आहेत.

Ajit Pawar, Eknath shinde, Devendra fadnavis, Uddhav thackeray, Sharad Pawar, Nana Patole
BJP Politics : भाजपच्या 'या' नेत्याचा निकालाबाबत 'अंदाज' तंतोतंत ठरला खरा

गुलाबराव देवकर अजित पवार गटाच्या वाटेवर

जळगावातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री गुलाबराव देवकर हे अजित पवार गटात प्रवेश करणार करणार असल्याचे समजते. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांआधी राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाला काही प्रमाणात बळ मिळण्याची शक्यता आहे.

जळगाव ग्रामीणची जागा शरद पवारांनी प्रतिष्ठा पणाला लावून उद्धवसेनेकडून घेऊन गुलाबराव देवकरांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते शिंदेसेनेच्या गुलाबराव पाटलांकडून ५९ हजार मतांनी पराभूत झाले होते. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची त्यांनी भेट घेतली.

Ajit Pawar, Eknath shinde, Devendra fadnavis, Uddhav thackeray, Sharad Pawar, Nana Patole
Shivsena UBT : 'शेख हसीना लाडकी बहीण पण बांगलादेशातील हिंदू भाऊ बहि‍णींचे काय?', उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक

मोहन हंबर्डे 'पंजा' ची साथ सोडण्याच्या तयारीत

हे बदलते वारे पाहता विधानसभा निवडणुकीत फटका बसलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी आता वेगळा पर्याय शोधायला सुरवात केली आहे. नांदेड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. अवघ्या दोन हजार मतांनी हंबर्डे यांची आमदार होण्याची संधी हुकली. हे शल्य हंबर्डे आणि त्यांच्या समर्थकांना अजूनही आहे. यातूनच आता मोहन हंबर्डे हे 'पंजा' ची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. येत्या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा रंगली आहे.

Ajit Pawar, Eknath shinde, Devendra fadnavis, Uddhav thackeray, Sharad Pawar, Nana Patole
Shivsena News : खातेवाटपावरून शिंदे गटाच्या बड्या नेत्याचे सूचक वक्तव्य; म्हणाले, 'मंत्रिपदाचे वाटप करताना...'

हर्षवर्धन पाटलांनी सहकुटुंब घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी भाजप सोडून तुतारी हाती घेतली होती. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला सल्ला झुगारून हर्षवर्धन पाटील शरद पवार गटातर्फे इंदापुरातून विधानसभा लढले. पाटील यांचा अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणेंनी १९ हजार मतांनी पराभव केला होता. हर्षवर्धन यांनी पत्नी भाग्यश्री, पुत्र राजवर्धन, मुलगी अंकिता पाटील-ठाकरे यांच्यासह फडणवीसांची भेट घेतली.

Ajit Pawar, Eknath shinde, Devendra fadnavis, Uddhav thackeray, Sharad Pawar, Nana Patole
BJP Politics : भाजपच्या 'या' नेत्याचा निकालाबाबत 'अंदाज' तंतोतंत ठरला खरा

अजितदादांच्या बॅनरवर सतीश चव्हाणांचा फोटो

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरची जागा महायुतीमध्ये भाजपला सुटणार, असे लक्षात आल्यावर अजित पवारांकडून शरद पवारांकडे आमदार सतीश चव्हाण गेले होते. या निवडणुकीत त्यांना 5 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थकांनी लावलेल्या बॅनरवर सतीश चव्हाण यांचा फोटो झळकत असल्याने पुन्हा घरवापसीची चर्चा रंगली आहे.

Ajit Pawar, Eknath shinde, Devendra fadnavis, Uddhav thackeray, Sharad Pawar, Nana Patole
BJP MLA T Raja News : 'बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेसाठी...' ; भाजप आमदार टी. राजा यांचं मोठं विधान!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com