Supriya Sule Latest News Sarkarnama
पुणे

Supriya Sule Latest News : ...तर दादाही मला मतदान करतील' सुप्रिया सुळेंना का वाटतो एवढा विश्वास

Sudesh Mitkar

Baramati Lok Sabha News : आज बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत. यासाठी महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या MVA उमेदवार सुप्रिया सुळे या पुण्यात दाखल झाल्या असून, अर्ज भरण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. तत्पूर्वी दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना पाहायला मिळत आहेत. सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी आज पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

सुप्रिया सुळेंनी आज पुण्यात प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला, बारामती लोकसभा मतदारसंघातून Baramati Lok Sabha Election मला तीन टर्म दिल्लीत पाठवणाऱ्या सर्वांचे मी आभार मानते. आता चौथ्यांदा मला दिल्लीत पाठवण्यासाठी मी आज अर्ज भरणार आहे. जबाबदारी वाढली आहे. ही लढाई माझ्यासाठी वैयक्तिक नाहीतर वैचारिक आहे. संसदेमध्ये भाषण करताना मी कधीही कोणावरती वैयक्तिक टीका केली नाही. मी नेहमीच विकासाबाबत बोलत आले आहे आणि यापुढेदेखील विकासाबाबत बोलत राहील.

पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार Ajit pawar आणि शरद पवार Sharad Pawar यांना बारामतीमध्ये अडकून पडावं लागलं असल्याचं बोललं जातंय, याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवार बारामतीमध्ये अडकून पडलेले नाहीत ते राज्याच्या दौऱ्यावरती आहेत. तुम्ही त्यांच्या दौऱ्यांची यादी पाहिल्यास ते महाराष्ट्रभर दौरे करत असल्याचे तुम्हाला निदर्शनास येईल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

बारामतीमध्ये Baramati गेल्या पंधरा वर्षांत सुप्रिया सुळे यांनी कोणताच विकास केला नसल्याची टीका अप्रत्यक्षरीत्या अजित पवारांनी केली होती. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, कदाचित अजितदादांनी माझा कार्य अहवाल वाचला नसेल. मी माझा मराठीतला कार्य अहवाल त्यांना आजच पाठवून देईल. जर त्यांनी वेळ काढून माझा कार्य अहवाल वाचला तर दादा मेरिटवर नक्कीच मला मतदान करतील, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे आता सुनेला निवडून द्या, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं, त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, पवारांच्या कुटुंबातील कुठली सासू निवडणूक लढली आहे? माझ्या आईला तर फोटो काढलेलादेखील आवडत नाही. ती प्रायव्हेट आणि सन्मानाने आयुष्य जगली आहे. माझ्या माहितीप्रमाणे तरी अशा काकी, सुमती काकू, भारती काकू, माझी मोठी काकी असेल आणि माझी आई यापैकी माझ्या माहितीप्रमाणे कुठलीच सासू निवडणूक लढलेली नाही.

बारामती परिसरामध्ये असलेल्या दुष्काळावरती सुप्रिया सुळे म्हणाल्या, परिसरातून 35 वर्षे आमदार कोण आहे? 18 वर्षे पालकमंत्री कोण राहिला आहे, त्यामुळे ही सर्वांची जबाबदारी असते ना, असा सवाल त्यांनी अजितदादांना केला. तेव्हा आमचा पक्ष एकच होता आम्ही टीम वर्क म्हणून काम करायचं, असंदेखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT