Pune News : बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी पुढील विधानसभेचा महाविकास आघाडीचा MVA उमेदवार हे संग्राम थोपटेच Sangram Thopate असतील आणि ते आज सहकार्य करताहेत त्यांचे पदाधिकारी सहकार्य करतात त्यांच्यापेक्षा जास्त दहा टक्के मेहनत विधानसभेला आम्ही करू, महाविकास आघाडीचे सरकार आल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. या वक्तव्यामुळे शिवसेना ठाकरे गटामध्ये असलेले कुलदीप कोंडे नाराज झाले होते. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे Supriya Sule यांच्याकडून करण्यात आला. मात्र, त्याला अपयश आले असून, कुलदीप कोंडे आता शिवसेना शिंदे गटात Shivsena Shinde Group दाखल झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आले. यानंतर झालेल्या सभेत भोरमधील ठाकरे गटातील नेते कुलदीप कोंडे Kuldeep Konde यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यात आला. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यामुळे कुलदीप कोंडे काही दिवसांपासून नाराज होते. त्या नाराजीचा फायदा घेत माजी आमदार विजय शिवतारे यांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना महायुतीत आणलं आहे. सुप्रिया सुळे Supriya Sule यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मागे दोन विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस उमेदवार संग्राम थोपटे आणि शिवसेनेचे उमेदवार कुलदीप कोंडे यांच्यामध्ये झाले आहेत. दोन्ही निवडणुकांमध्ये कुलदीप कोंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ते पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवरती सुप्रिया सुळे यांनी थेट संग्राम थोपटे हेच महाविकास आघाडीचे MVA विधानसभेचे उमेदवार असतील, असं सांगितल्याने कुलदीप कोंडे आणि ठाकरे गटाची इतर पदाधिकारी नाराज झाले होते.
याबाबतची उघड उघड नाराजी व्यक्त करताना कुलदीप कोंडे म्हणाले, प्रचार चालू झाल्यापासून पवारसाहेबांनी आणि सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी पहिल्यापासून संग्राम थोपटे यांना झुकतं माप दिलेलं आहे. या सगळ्यांमध्ये आमचा शिवसेनेचा कार्यकर्ता Shivsena आणि पदाधिकारी यांना डावलल जातंय. याच्या तक्रारी आम्ही वारंवार पक्षश्रेष्ठींकडे केलेल्या आहेत, हे निवडणुकीचं वार आहे त्यामुळे उमेदवाराला जास्त त्रास होऊ नये, याची आम्ही काळजी घेतोय. मात्र, सध्या फक्त लोकसभेतबाबत बोलावं विधानसभेच्या वेळेस जो निर्णय घ्यायचा तो पक्षाचे ज्येष्ठ नेते घेतील, असं मत कोंडे यांनी मांडले होते.
कोंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुळे यांच्या प्रचारात सहभागी होणे टाळले होते. या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी ठाकरे गटाचा मेळावा नसरापूर येथे पार पडला. या मेळाव्याला संपर्कप्रमुख सचिन अहिर उपस्थित होते. त्यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याने सुप्रिया सुळे यांना याबाबतची कल्पना देण्यात आली, त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पुणे बावधन येथील दौरा अर्धवट सोडत या मेळाव्याला भेट दिली आणि नाराजांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला अपयश आल्याचा आता स्पष्ट झाले आहे. भारत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि इतर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या उपस्थितीमध्ये कुलदीप कोंडे हे महायुतीमध्ये दाखल झाले आहेत.
Edited By : Rashmi Mane
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.