CM Devendra Fadnavis, Supriya Sule Sarkarnama
पुणे

Supriya Sule : "या २०० आमदारांचं करायचं काय?" पुण्यासह राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर सुप्रिया सुळे भडकल्या; फडणवीसांना दिलं थेट आव्हान

Supriya Sule on Pune Crime: पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये गेल्या काही काळापासून सातत्यानं गुन्हेगारी घटना घडत आहेत, गुन्हेगारांवर कुठलाही वचक नसल्यानं यावर नियंत्रण राहिलेलं नाही.

Amit Ujagare

Supriya Sule on Pune Crime: पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये गेल्या काही काळापासून सातत्यानं गुन्हेगारी घटना घडत आहेत, गुन्हेगारांवर कुठलाही वचक नसल्यानं यावर नियंत्रण राहिलेलं नाही. नुकतीच पुण्यात विषारी दारुमुळं २२ जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. यापार्श्वभूमीवर बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र सरकारवर आगपाखड केली आहे. गुन्हेगारी कमी होत नसेल आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण लाभत नसेल तर सत्तेत असलेल्या २०० आमदारांचं करायचं काय? असा थेट सवाल त्यांनी केला आहे. तसंच फडणवीसांना थेट आव्हानही दिलं आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, भोरमध्ये घटना घडली त्या लहान मुलीची हत्या झाली. तेव्हा हे कृत्य करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देऊ हा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला आणि मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला आम्ही कुठलंही राजकारण केलं नाही, आम्ही समंजसपणे माणुसकी दाखवली. पण आजही गुन्हेगारी घटनांचा हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळं आजही आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा पुन्हा विनंती करतोय. पण आज जर हा प्रश्न सुटला नाही आणि आम्हाला पुण्यात कुठलीही सुधारणा दिसली नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन सुप्रिया सुळे करेल हा मी पुणेकरांना शब्द देते.

एकमतानं पुणे शहरात भाजपला पुणेकरांनी एवढी मोठी साथ दिली. महापालिकात ११९ नगरसेवक, महायुतीचे ८ आमदार तसंच एकहाती राज्यात आणि महापालिकेत सत्ता आहे पण या आमदारांपैकी कोणीही पुण्यातील आणि राज्यातील गुन्हेगारीवर बोलत नाही. त्यामुळं या सत्ताधाऱ्यांकडून आम्हाला कसलीच अपेक्षा नाही, कारण भाजपवर टीका करायला मी इथे बसलेलेच नाही. पुणेकरांन न्याय मिळवून देण्यासाठी मी इथं बसले आहे आणि तो जर भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष पुणेकरांना देणार नसतील तर त्यांच्याविरोधात लढण्यासाठी मी हजर आहे.

पुण्यात विषारी दारुचे बळी हे सरकारचं अपयश आहे. कारण हे बळी गेल्याशिवाय त्यांना पुण्यात विषारी दारु मिळते हे माहिती नव्हतं? हप्ते हा शब्द सर्वांनी ऐकलाच आहे ना? महाराष्ट्राच्या सरकारला, यंत्रणेला मग उत्पादन शुल्क विभाग असू देत किंवा गृहखात असू देत, या सगळ्यांना या गोष्टी माहिती होत्या. पत्रकारांना कळतात सरकारला कळत नाही? मग काय करायचं या २०० आमदारांचं, मग गृहमंत्रालय काय करतंय? अतिशय भयानक आणि अपयश गृहमंत्रालयाचं आपण पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पाहिलं आहे. कधीतरी महाराष्ट्र सरकारनं नैतिकता दाखवावी आणि याची जबाबदारी घ्यावी, अशी आग्रही मागणीही यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली.

पुण्यातील विषारी दारुची बळी गेल्याचं महापौर मंजुषा नागपुरे यांना माहितीचं नव्हतं हे स्वतः त्यांनी कबूल केलं असून आपल्याला हे माध्यांकडूनच कळालं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावरुन सुप्रिया सुळे यांनी टीका करता इतकं असंवेदनशील सरकार मी आजवर पाहिलं नव्हतं असंही त्या म्हणाल्या. तसंच मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की पुण्याच्या महापौर जर असं बोलल्या असतील तर त्याची नोंद माणुसकीच्या नात्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घ्यावी, असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT