Supriya Sule Sarkarnama
पुणे

Supriya Sule Constituency : नणंद-भावजय हा कौटुंबिक कार्यक्रम नाही तर...; सुप्रिया सुळेंचा एल्गार

Baramati Lok Sabha Constituency News : मी हर्षवर्धन पाटलांना फसवलं असे कुणीच बोलू शकणार नाही

Sunil Balasaheb Dhumal

Baramati Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबातही दरी निर्माण झाली. बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असून याकडे देशाचे लक्ष लागले आहे. त्या दृष्टीने अजित पवार गटाकडून तयारी सुरू केली असून आता सुप्रिया सुळेंनी मी निवडणुकीसाठी तयार असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे. त्या इंदापुरातील कार्यक्रमात बोलत होत्या. (Supriya Sule Constituency)

सुळे म्हणाल्या, बारामती (Baramati) लोकसभेची निवडणूक म्हणजे नणंद भावयजाचा कौटुंबिक कार्यक्रम नाही. आता सरपंचपदासह लोकसभा अशा सर्व निवडणुका सिरिअसली घेतल्या पाहिजेत. त्यामुळे समोर कुणीही उमेदवार असो, बारामतीच्या प्रश्नांवर कुणाशीही चर्चा करायला तयार आहे, असे सांगत सुळेंनी लोकसभा निवडणुकीसाठी आपणही तयार असल्याचे सूचित केले आहे.

लोकसभेची निवडणूक ही कौटुंबिक नसून वैचारीक पातळीवर होणार आहे. बारामतीकरांनी मला त्यांच्या समस्या मांडण्यासाठीच संसदेत पाठवले आहे. त्यामुळे तेथे भाषण करावेच लागते. बारामतीतून माझ्या विरोधात कोण उमेदवार असेल, याबाबत मला माहिती नाही. मात्र समोर कुणीही असू द्या; वेळ, स्थळ सांगावे तेथे बारामतीच्या प्रश्नांवर चर्चा करण्यास तयार आहे, असे आव्हान करत सुप्रीया सुळेंनी (Supriya Sule) यापुढे प्रत्येक निवडणूक सिरिअसली घेणार असल्याचेही स्पष्ट केले.

बारामती लोकसभेसाठी महायुतीतील भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshawardhan Patil) यांच्या कन्या अंकिता पाटील-ठाकरेंनी अजित पवारांना आव्हान दिले आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, अंकिता (Ankita Patil) यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांचा तो महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे. काही नाती ही राजकारणाच्या पलीकडे असतात. आमच्यात राजकीय मतभेद आहेत. ज्यांनी मला लोकसभेसाठी दोनदा मदत केली त्यांना मी विसरू शकत नाही. त्यामुळे मी फसवणूक केली, असे हर्षवर्धन पाटील म्हणूच शकत नाहीत, असा विश्वासही सुळेंनी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT