Supriya Sule Sarkarnama
पुणे

Supriya Sule : आमदार गेले असले तरी संघटना साहेबांसोबतच, सुप्रिया सुळेंनी ठणकावले

Supriya Sule NCP Sharad Pawar : अदृश्य शक्तिने पदाचा वापर करून घर फोडलं, पक्ष फोडला, पण याचे उत्तर लोकसभा निवडणूक त्यांना दिले. सत्याचा विजय होतो, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Roshan More

Supriya Sule News : राष्ट्रवादीच्या फूटसंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्याचा विजय होतो. पक्षाच्या संविधानामुळे पक्ष पवार साहेबांकडे राहील. आमदार गेले असले तरी संघटना साहेबांसोबत आहेत, असे ठणकावून सांगितले.

शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांचाच आहे. राज ठाकरे यांची लाईन चांगली होती. त्यांनी वेगळा पक्ष काढला.अदृश्य शक्तिने पदाचा वापर करून घर फोडलं, पक्ष फोडला पण याचे उत्तर लोकसभा निवडणूक त्यांना दिले. सत्याचा विजय होतो, असे देखील सुळे म्हणाल्या.

पक्ष फूटबाबती बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमची लढाई कोर्टात आहे, आम्ही लढू. आमच्या सोबत जे झालं ते दुसऱ्या सोबत होऊ नये. पक्ष चिन्ह मागितले असते तर दिले असते. काय आम्ही गाठोडे घेऊन जाणार आहोत. महाराष्ट्र आणि देशाचा राजकारण यांनी गलिच्छ केलं, असा संतापही सुळे यांनी व्यक्त केला.

मेरीटवर कार्यालय मिळाले

लोकसभा सचिवालयाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला कार्यालय देण्यात आले. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमचा संविधानावर विश्वास आहे.जी प्रोसिजर आहे त्याप्रमाणे आम्ही काम करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांचाच आहे. आम्हाला मेरीटवर कार्यालय मिळाले.

कोर्टावर विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचुड यांच्या घरी गेले होते. पंतप्रधान गणपतीची आरती करत असलेला फोटो देखील समोर आला होता. पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाण्याने विरोध त्यांच्यावर टीका करत आहेत.

त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, या देशाचे सरन्यायाधीश आणि प्रधानमंत्री हे मोठं पद आहे. लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. अशी घटना झाली आहे असे वाचनात आले. मलाही आश्चर्य वाटलं. माझा कोर्टावर विश्वास आहे. न्यायाधीशांनी विचार करूनच हे केला असेल. पण माझा सरकारवर विश्वास नाहीये माझा कोर्टावर विश्वास आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT