Supriya Sule Sarkarnama
पुणे

Pune News : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवेघाटाची वाट होणार सोपी, सुप्रिया सुळेंनी दिली मोठी माहिती

Sachin Fulpagare

Pune Latest News Updates : पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवेघाट या अंतराचे चौपदरीकरण आणि दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने 792.39 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली. आपल्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.

हडपसर ते दिवेघाट या पालखी महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी तसेच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. याशिवाय घाट भाग हा वन विभागाच्या हद्दीत असल्याने रुंदीकरणास अडथळे येत होते. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने या रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय महामार्ग मंत्रालयाकडे पाठपुरावा करत होत्या.

शरद पवार यांनीही याबाबत केंद्राकडे शब्द टाकला होता. त्याला अपेक्षित यश आले असून काही दिवसांपूर्वी निविदा काढण्याचे आदेश देण्यात आले. त्यावेळी 399.02 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यात आता वाढ करण्यात आली असून 792.39 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार सुप्रिया सुळे यांनी या निधीसाठी नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. हे काम पूर्ण झाल्यावर हडपसर ते दिवेघाट या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या बऱ्याच अंशी दूर होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. या मार्गावरून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जाते. हा पालखी सोहळा देखील अतिशय उत्तम पद्धतीने पार पडू शकेल, असेही सुप्रिया सुळे यांनी नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT