Suresh Kalmadi Sarkarnama
पुणे

काँग्रेसने दूर लोटलेल्या कलमाडींच्या कार्यक्रमाला भाजप नेत्यांची मांदियाळी!

सुरेश कलमाडी यांच्या पुणे फेस्टिव्हलाचे उदघाटन भाजप नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह स्थानिक भाजप नेत्यांची उपस्थिती असणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : काँग्रेस (Congress) पक्षाचे माजी खासदार सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) यांच्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे उद्‌घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांच्या हस्ते बहुतांश भाजप (bjp) नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे कलमाडी यांची भाजपशी जवळीक वाढल्याची चर्चा पुण्यात रंगली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर काँग्रेसने कलमाडी यांना पक्षातून निलंबित केले होते. तेव्हापासून ते काँग्रेसपासून चार हात दूरच राहिले होते. आता मात्र कलमाडी आयोजक असलेल्या पुणे फेस्टिव्हलचे उद्‌घाटन भाजप नेत्यांच्या गर्दीत होणार आहे. विशेष म्हणजे येत्या ६ सप्टेंबरला होणाऱ्या मिस पुणे स्पर्धेला अमृता फडणवीस उपस्थित राहणार आहेत. (Suresh Kalmadi's Pune Festival will be inaugurated by BJP leaders)

पुणे फेस्टिव्हलचं उद्‌घाटन शुक्रवारी (२ सप्टेंबर) सायंकाळी होणार आहे. या वर्षी उद्‌घाटक म्हणून भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येणार आहेत. सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह स्थानिक भाजप नेत्यांची उपस्थिती असणार आहे. याशिवाय चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारही या कार्यक्रमास हजेरी लावणार आहेत. मात्र, पुणे फेस्टिव्हलचा इतिहास पाहता बहुतांश वेळा उद्‌घाटन हे काँग्रेस नेत्यांच्या हस्तेच झालेले आहे. यंदा मात्र भाजप नेत्यांच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळाच्या भूवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुरेश कलमाडी यांच्यावर झाला होता. त्यानंतर काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केले होते. तेव्हापासून कलमाडी हे काँग्रेसपासून दूर हेाते. काही दिवसांपूर्वी त्यांनी पुणे महापालिकेत हजेरी लावली हेाती. त्यावेळी त्यांच्याकडून राजकारणात पुन्हा सक्रीय होण्याचे संकेत मिळाले हेाते. आता भाजप नेत्यांना उद्‌घानला बोलावून कलमाडी यांनी आपली दुसरी इनिंग तर सुरू केली नाही, अशी चर्चा पुण्यात रंगली आहे. ते राजकारणापासून दूर असले तरी त्यांना मानणारे कार्यकर्ते अजूनही पुण्यात आहेत, त्यामुळे भाजपच्या पाठिंब्याने ते आपली सेकंड इनिंग सुरू करतात का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचार आरोप केले, अशा लोकांनाच पक्षात घेऊन पावन केले आहे. यामध्ये विजयकुमार गावीत, बबनराव पाचपुते, कृपाशंकर सिंह यांच्यासह इझनावर नेत्यांवर भाजपकडून सुरुवातील आरोप करण्यात आले, त्यानंतर त्याच लोकांना भाजपमध्ये प्रवेश दिलेला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भ्रष्टाचाराचे प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे कलमाडींना भाजपत सामावून घेणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT