Pune News : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन महिला पदाधिकाऱ्यांचा वाद राज्यभर चर्चेत आहे. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणांमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पीडित महिला डॉक्टरच चारित्र्यहनन केल्याचा आरोप करत रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी चाकणकरांवर जोर टीका केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्हीही पक्षाच्या महिलांना पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या वादाची दखल पक्षाने घेत रूपाली पाटील ठोंबरे यांना कारणे दाखवा नोटीस देखील पाठवली होती. त्यानंतर आता ठोंबरे यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. ही हकालपट्टी झाल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर आरोप केल्यानंतर पक्षाकडून रूपाली ठोंबरे यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. संघटक सरचिटणीस संजय खोडके रूपाली पाटील ठोंबरे यांना ही नोटीस पाठवली आहे. या नोटिशीमध्ये आपणास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली असताना आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष व पक्षाच्या महिलाध्यक्षा यांच्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये केलेले वक्तव्य हे पक्षशिस्त भंग करणारे आहे.
म्हणून आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का ? करण्यात येऊ नये याचा खुलासा प्रदेश कार्यालयाकडे 7 दिवसांच्या आत करावा अन्यथा आपल्या विरुद्ध योग्य ती पुढील कार्यवाही करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी असं नमूद करण्यात आले होते.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यातील प्रवक्त्यांची यादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या माध्यमातून सोमवारी (ता.10) जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून रूपाली पाटील ठोंबरे यांचे नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चाकणकर विरुद्ध रूपाली ठोंबरे यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर रूपाली पाटील ठोंबरे यांची हकालपट्टी केली असल्याचं बोललं जात आहे.
त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "रूपाली पाटील ठोंबरे ही माझी चांगली मैत्रीण आहे आणि भविष्यात देखील राहणार आहे. तिला कोणाचीही कोणतीही भीती नाही. सर्वार्थाने ती ईडी, सीबीआयची भीती नसणारी अतिशय क्लीन इमेज असलेली व्यक्ती आहे, अशा व्यक्तीला कोणीही पक्षात घेईल.
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, कुठल्याही पक्षाने पदाधिकारी नेमणे हा त्यांचा पूर्णतः अंतर्गत विषय आहे. मात्र तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या या यादीतील एकूण नाव बघता एक फरक लक्षात येईल. अमोल मिटकरी आणि रूपाली ठोंबरे हे दोन्ही प्रवक्ते कायम दादांसाठी खिंड लढवत असतात मात्र त्यांना या यादीत स्थान नाही.
पण अगदी त्याचवेळेला मित्रपक्षातल्या आमदारांकडून दादांवर पराकोटीची जहरी टीका होताना अतिशय मौन बाळगणारे सुरज चव्हाण तटकरेंवर कोणी चकार शब्द काढला तर अगदी मारामारी करण्यापर्यंतची तत्परता दाखवू शकतात. कदाचित म्हणूनच या यादीत सुरज चव्हाणला स्थान आहे.थोडक्यात काय तर जो दादांची बाजू घेईल त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. तटकरे हळूहळू पक्ष टेकओव्हर तर करत नाहीत ना ? असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.