Maharashtra politics : हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे (पश्चिम),मुंबई येथील बंगल्याबाहेर आज पहाटे गोळीबार झाल्यावरून विरोधकांनी राज्यातील महायुती सरकार हे गोळीबार सरकार असल्याचा हल्लाबोल लगेच केला. राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी लक्ष्य केले. नापास झालेल्या या गृहमंत्र्यांबद्दल नव्याने आणखी काय शंख करायचा,अशी बोचरी टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रविवारी पिंपरीत केली.
सेलिब्रेटीच्या घरासमोरच्या घटना समोर येत आहेत, हे गंभीर आहेच आहे. पण गावखेड्यात रोज मायमाऊलींच्या अब्रूंचे धिंडवडे निघताहेतअशी खंत अंधारेंनी व्यक्त केली. राज्यातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून त्यांनी फडणवीसांवर क़डाडून टीका केली. हजारो कोटी रुपयांचे ड्रग सापडूनही त्याचा नेक्सस त्यांना सापडला नाही,असा टोला त्यांनी मारला. अशा नापास गृहमंत्र्याबद्दल नव्याने काय शंख करायचा?असा बोचरा सवाल त्यांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपने आजच जाहीर केलेल्या लोकसभेच्या निवडणूक जाहीरनामा तथा संकल्पपत्राची अंधारेंनी चिरफाड केली. त्यातील विरासत से विकास तक हमे पहूंचना है या संकल्पावर बोलताना त्या म्हणाल्या, ते हा पूर्ण करूच शकत नाहीत. कारण राज्यातील त्यांचे 12 आणि देशातील 112 उमेदवार हे विरासत तथा घराणेशाहीचेच धनी आहेत.
भ्रष्टाचार का समूल उच्चाटन करना है हा दुसरा संकल्पही असाच असून जेवढा मोठा भ्रष्टाचार तेवढी मोठी त्याची भाजपमध्ये एंट्री होत असल्याने ते भ्रष्टाचार संपवून शकत नाही,असा टोला त्यांनी लगावला.
विकास पोचवू, प्रश्न सोडवू या भाजपच्या आणखी एका आश्वासनाची चिरफाड करताना अंधारेंनी गेल्या दहा वर्षात दिलेल्या समुद्रातील शिवस्मारक, इंदू मिलमधील डॉ.बाबासाहेबांचे स्मारक, 15 लाखांचे काय झालं, दरवर्षी दोन करोड रोजगार देणार होतात, त्याच कायं झालं? महागाई कमी करणार होतात,त्याचं काय झालं ? याची उत्तरे मोदी आणि त्यांच्या भक्तूल्यांनी द्यावीत आणि मग नव्या संकल्पपत्रावर बोलावं,असे आव्हान सुषमा अंधारेंनी दिले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.