Shirur Lok Sabha 2024: संकट मोचकच संकटात, आढळरावांचा कोल्हेंवर हल्लाबोल, "ते हवा निर्माण करताहेत..."

Shirur Lok Sabha Election 2024: शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात थेट लढत होणार आहे. या मतदारसंघामधील निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई असल्याचं बोललं जात आहे.
Amol Kolhe, Shivajirao Adhalrao Patil
Amol Kolhe, Shivajirao Adhalrao PatilSarkarnama

Shivajirao Adhalrao Patil On Amol Kolhe: लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. आपल्या विरोधकावर टीका करण्याची एकही संधी उमेदवार सोडत नाहीत. अशातच महायुतीचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे (Shirur Lok Sabha Constituency) उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे. सध्या अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळखले जातं, परंतु संकटमोचक सध्या संकटात आहेत, त्यामुळे ते हवा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं आढळराव म्हणाले.

यंदा शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Patil) गटात थेट लढत होणार आहे. या मतदारसंघामधील निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले प्रतीहल्ले सध्या सुरू आहेत. अशातच या मतदारसंघाचे युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या अमोल कोल्हेंवर अनेक आरोप केले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुण्यामध्ये मार्केट यार्ड परिसरात शेतकरी आणि व्यापाऱ्यांची भेटी घेण्यासाठी आढळराव पाटील आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आढळराव पाटील म्हणाले, शिरूर मतदार संघामधून तीन लाखाहून अधिक मताधिक्याने माझा विजयी होईल. 2014 साली लोकसभेच्या निवडणुकीत मला भोसरी, हडपसर या ठिकाणाहून तब्बल एक लाखाचा लीड मिळालं होतं. त्याचप्रमाणे यंदा देखील या भागातून मला मोठं लीड मिळेल, याची मला खात्री आहे.

महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना आणि भाजप (BJP) हे सध्या एकत्रित असून मोठी ताकद यामुळे माझ्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे निश्चितपणे साडेतीन लाख मताधिक्य आम्हाला मिळेल असा विश्वास आढळराव पाटलांनी यावेळी व्यक्त केला. आढळराव पाटील यांनी मतदारसंघात काम केली नसल्याची टीका वारंवार केली जात आहे. यावर बोलताना आढळराव पाटील म्हणाले, 2019 च्या निवडणुकीमध्ये खासदार म्हणून निवडून अमोल कोल्हे (Amol kolhe) आले असताना मी कशी काय काम करायची? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Amol Kolhe, Shivajirao Adhalrao Patil
Rupali Chakankar News : साहेबांच्या वक्तव्यामुळे सुनांचा सासुरवास वाढला! रुपाली चाकणकर संतापल्या

कोल्हेंच्या जाहीरनाम्यात मी केलेली कामे

आता अमोल कोल्हे यांच्या प्रचार अहवालामध्ये जे छापून आली आहेत ती कामे मी केलेली आहे. जी काम मी केली ती काम जशीच्या तशी उचलून त्यांनी अहवालामध्ये टाकली आहेत. तसेच त्यांनी 2019 च्या जाहीरनाम्यात जी कामे करणार असल्याचं वचन दिलं होतं, त्यातली एकही काम त्यांनी गेल्या पाच वर्षात केले नसल्याचा आरोपदेखील आढळराव पाटील यांनी कोल्हेंवर केला.

Amol Kolhe, Shivajirao Adhalrao Patil
Sushma Andhare News: अंधारेंनी राणेंना दिल्या शुभेच्छा; म्हणाल्या, 'चांगल्या डॉक्टरांना दाखवा, लवकर बरे व्हा...'

आमदारांना विधानसभेबाबतच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्याच्यावरती बोलताना आढळराव पाटील म्हणाले, "जनता आमच्यासोबत आहे. त्यामुळे आमदारांना धमक्या देण्याचं काहीच कारण नाही. विरोधक फक्त अफवा सोडतात आणि सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात."

तसेच सध्या अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळखले जात आहे.यावर बोलताना आढळराव पाटील म्हणाले, संकटमोचकच सध्या संकटात आहे. त्यामुळे ते हवा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र वास्तवात ते स्वत: संकटात असल्याचं आढळराव पाटील म्हणाले.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com