Swargate Rape case Sarkarnama
पुणे

Swargate Rape Case : स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी गाडेची आता DNA चाचणीही होणार!

Dattatray Gade DNA test : ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी व लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली असून अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Mayur Ratnaparkhe

Dattatray Gade news : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकाच्या आवारात एका शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना मंगळवारी (ता. २५) घडली होती. आरोपी गाडेने तरुणीकडे वाहक असल्याची बतावणी करत तिला शिवशाही बसमध्ये नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.

तर तरुणीवर अत्याचार करुन पसार झालेल्या दत्तात्रय गाडे(Dattatray Gade) याला शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली. न्यायालयाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान पोलिस कोठडीत असलेल्या गाडेचा जबाब शनिवारी पोलिसांकडून नोंदविण्यात आला.  तसेच त्याची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी तसेच लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली.

या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती पोलिसांनी(Police) दिली आहे. आता गाडेची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. तसेच त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. रक्त आणि केसांचे नमुने डीएनए चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

स्वारगेट आगारात थांबलेल्या तरुणीला ‘ताई’ म्हणत आरोपीने शिवशाही बसमध्ये नेऊन गळा दाबून अत्याचार केला. त्यानंतर ‘दादा मला घरी जाऊ द्या,’ अशी विनवणी तरुणी करत असतानाही आरोपीने तिला मारहाण करून दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केला, असे फिर्यादित नमूद आहे.

ज्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला त्या बसची न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी पाहणी केली आहे. घटनास्थळाचा  पंचनामा करण्यात आला असून, बस न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT