Swargate Rape Case : स्वारगेट अत्याचार प्रकरणात महत्त्वाची अपडेट, कोर्टाकडून पोलिसांची मोठी मागणी मान्य, आरोपी दत्ता गाडेला दणका

Datta Gade Police Custody News : पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना 3 दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर या घटनेवर सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात होता. अखेर मध्यरात्री पोलिसांना आरोपी दत्ता गाडे याला अटक करण्यात यश आलं आहे.
Swargate Rape case
Swargate Rape caseSarkarnama
Published on
Updated on

Pune News : स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे शुक्रवारी (ता.28) पोलिसांनी अटक केली आहे.त्यानंतर त्याला पुण्याच्या लष्कर पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. यानंतर शुक्रवारी सायंकाळी आरोपी दत्ता गाडे (Datta Gade) याला शिवाजीनगर कोर्टासमोर पोलिसांनी हजर केले. यावेळी सरकारी वकिलांसह पोलिसांनी आरोपीला 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. यावेळी न्यायालयानं आरोपीला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार (Swargate Rape Case) झाल्याची घटना 3 दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर या घटनेवर सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात होता. अखेर मध्यरात्री पोलिसांना आरोपी दत्ता गाडे याला अटक करण्यात यश आलं आहे. आरोपी गाडेला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं.

स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पुणे सत्र न्यायालयाने (Court) 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.परंतु, आरोपीच्या वकील वाजिद खान बीडकर यांनी आरोपीचा बचाव करताना मोठा दावा केला. मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली.दोघांच्या संमतीनं हे संबध झाले आहेत, असे आरोपीनं आम्हांला त्याची बाजू मांडताना सांगितल्याचेही वकिलांनी न्यायालयात सांगितलं. पण सरकारी वकिलांनी आरोपीच्या वकिलांचा हा दावा खोडून काढला. यानंतर न्यायालयानं दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपीला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली दिली.

Swargate Rape case
Shinde vs Naik : नाईकांविरोधात शिंदेंनी उतरवला ठाण्याचा वाघ; नवी मुंबईत फोडणार डरकाळी

तर या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील सरकारी वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना आरोपीला 14 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केली. यावेळी त्यांनी या अत्याचार प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही तपासले आणि दत्ता गाडेला अटक केली.आरोपी अत्यंत सराईत असून मोबाईल बंद करून फिरत होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचंही कोर्टात सांगितले.

तसेच या घटनेतील आरोपीचे मोबाईल, कपडे जप्त करायचे आहेत, त्याची वैद्यकीय तपासणी करायची आहे. त्याचे इतर कुणी साथीदार आहेत का याचा तपास करायचा आहे. त्याने कुणाकडे आसरा घेतला याचा तपास करायचा असल्याचं सांगत आरोपीवर एकूण 6 गुन्हे दाखल असल्याची माहितीही दिली.तसेच त्याने असे अजून काही गुन्हे केले आहेत का तपासायचं आहे,त्यामुळे आरोपीला 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी युक्तिवादावेळी केली.

Swargate Rape case
Tanaji Sawant News : माजी मंत्री तानाजी सावंतांचा आरोग्य विभागातील नवा घोटाळा; 70 कोटींच्या कामासाठी 3190 कोटी

तत्पूर्वी, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी पोलीस स्टेशन बाहेर काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन सुरू केलं आहे.यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.तसेच आरोपीच्या घेऊन येत असलेल्या वाहनावर बांगड्या फेकण्यात आल्या.तसेच आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणीही करण्यात आली. आरोपीचं वकीलपत्र वाजिदखान बीडकर यांनी घेतलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com