Swargate Bus Depot Case : आरोपीच्या वकिलांचा तरुणीबाबतचा 'तो' दावा सरकारी वकिलांनी काही मिनिटांत खोडून काढला...

Datta Ghade Lawyer Statement : स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडे याला पुणे न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. न्यालयातील सुनावणीनंतर आरोपी दत्ता गाडेचे वकील सूमित पोटे आणि अजिंक्य महाडीक यांनी माध्यामांशी बोलताना अनेक धक्कादायक दावे केले आहेत.
Dattatraya Gade
Dattatraya Gade sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News, 01 March : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील (Swargate Bus Depot Rape Case) बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांनी खळबळजनक दावा केला आहे. या घटनेतील पीडितेवर बलात्कार झाला नाही, तर जे झालं ते दोघांच्या संमतीने झाला असून या दोघांमध्ये पैशावरून वाद झाल्याचं वकिलांनी सांगितलं आहे.

स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडे याला (Datta Ghade) पुणे न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. न्यालयातील सुनावणीनंतर आरोपी दत्ता गाडेचे वकील सूमित पोटे आणि अजिंक्य महाडीक यांनी माध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक दावे केले.

वकील म्हणाले, आरोपी दत्ता गाडे आणि घटनेतील मुलगी एकमेकांना एक महिन्यापासून ओळखत होते. त्यांचे कॉल रेकॉर्ड काढले तर ते समोर येईल. शिवाय हे दोघे बसमधून एकत्रच बाहेर आले. खाली उतरल्यानंतर ते दोघे कुठे गेले याची माहिती देखील घेण्यात यावी. या दोघांमध्ये पैशावरून वाद झाला होता.

Dattatraya Gade
Shivsena UBT : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी ठाकरेच असावे..., आमदारांसह नेत्यांचा सूर; भास्कर जाधवांच्या नावाला मात्र विरोध?

गाडे पळून गेला नाही तर त्याच्या गावी आला होता. गावाला पोलिस (Police) छावणीचे रुप आल्यामुले तो लपल्याचा दावाही वकिलांनी केला. तर आरोपी गाडेने त्या महिलेला साडेसात हजार रुपये रोख स्वरुपात दिले असून त्यावरुन त्यांच्यात वाद झाल्यामुळे आरोपी निघून गेला. त्याने कुठेही जबरदस्ती केलेली नाही.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

शिवाय आरोपीने संबंधित तरुणीला ऑनलाईन पैसे देतो, असं सांगितलं. मात्र, माझं आणि आरोपीचं हे सर्व बोलणं युक्तीवादानंतर बोलणं झाल्यामुळे मी याबद्दल कोर्टाला काहीही सांगितलं नसल्याचंही वकील सुमीत पोटे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

Dattatraya Gade
Tanaji Sawant News : माजी मंत्री तानाजी सावंतांचा आरोग्य विभागातील नवा घोटाळा; 70 कोटींच्या कामासाठी 3190 कोटी

दरम्यान न्यायालयात सरकारी वकिलांनी आरोपीवर दाखल असलेल्या 6 गुन्ह्यापैकी 5 गुन्ह्यात तक्रारदार महिला असल्यामुळे आरोपीचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ते स्पष्ट होत आहे. शिवाय या गुन्ह्यामुळे समाजात तीव्र पडसाद उमटले असून तो गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपचा असल्याचं न्यायालयात सांगितलं.

शिवाय तो आरोपी सराईत असून त्याने यापूर्वीही काही महिलांसोबत गैरकृत्य केलं आहे का तपासायचे आहे. तसंच आरोपीला मदत करणारे कोण आहे का? याबाबतचा तपास करण्यासाठी 14 दिवसांची पोलिस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तीवाद केला. दोन्ही बाजुचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी गाडे याला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com