Swargate Rape case Sarkarnama
पुणे

Swargate Bus Rape Case Update : 82 साक्षीदार तपासले, अश्लील व्हिडिओ पाहत...; स्वारगेट अत्याचार प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर

Swargate Bus Rape Case 893 Page Chargesheet Filed : समलिंग असल्याचा दावा आरोपी दत्ता गाडे याने केला होता तो दावा देखील फोल असल्याचे या दोषारोपपत्रातून उघड झाले आहे. आरोपी गाडे याची गुगल हिस्ट्री देखील पोलिसांनी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने बाहेर काढली.

Roshan More

Swargate Bus Rape Case News : स्वारगेट स्थानकातील एसटी बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याप्रकरणी पोलिसांनी कोर्टात तब्बल 893 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दोषारोपपत्रातून धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. आपण समलिंग असल्याचा दावा आरोपी दत्ता गाडे याने केला होता तो दावा देखील फोल असल्याचे या दोषारोपपत्रातून उघड झाले आहे.

आरोपी गाडे याची गुगल हिस्ट्री देखील पोलिसांनी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने बाहेर काढली त्यामध्ये तो सातत्याने अश्लील व्हिडिओ पाहत असल्याचे देखील समोर आले आहे. 25 फेब्रुवारीला स्वारगेट अत्याचार प्रकरण घडले होते. त्यानंतर तब्बल 52 दिवसांनी पोलिसांनी दोषारोपपत्र कोर्टात दाखल केले. पोलिसांनी तब्बल 82 साक्षीदार तपासले तसेच पाच साक्षीदारांनी आपला जबाब न्यायालयात नोंदवला. आरोपी हा पीडित तरुणीशी बोलत असताना साक्षीदारांनी पाहिले होते.

घटनास्थळी पुरावे सापडले

आरोपी घटनेच्यावेळी स्वारगेट बस स्थानकाता असल्याचे सीसीटिव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले. ज्या बसमध्ये ही घटना घडली त्या बसमध्ये शर्टाचे बटन तसेच केस सापडले होते. ते आरोपी दत्ता गाडे याचे असल्याचे रासायनिक प्रयोगशाळेच्या तपासणीत सिद्ध झाले आहेत.

अशी झाली होती अटक

आरोपी दत्ता गाडे याने तरुणीला धमकावत दोनदा अत्याचार केला. त्यानंतर तो आपल्या गावी गुनाट गावी गेला. पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो गावातील शेतांमध्ये जाऊन लपला. पोलिसांनी तब्बल 12 तास त्याचा शोध घेतला. भुकेने आणि पाण्यासाठी व्याकूळ झालेला गाडे हा शेतातून बाहेर आला होता त्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी त्याला शेतातून अटक केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT