Ranjit Kasle Arrest : मोठी बातमी! निलंबित पीएसआय रणजित कासलेला पोलिसांनी घेतले ताब्यात

Ranjit Kasle Beed Police Arrested : रणजित कासले गुरुवारी दिल्लीवरून पुण्यात आला होता. तो रात्री पुण्यातील एका हाॅटेलमध्ये मुक्कामी होता. आपण पोलिसांना शरण जाणार असल्याचे त्याने अधिच जाहीर केले होते.
Ranjeet Kasle On Walmik Karad News
Ranjeet Kasle On Walmik Karad NewsSarkarnama
Published on
Updated on

Ranjit Kasle News : वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरचा प्लॅन असल्याचा धक्कादायक दावा करणाऱ्या रणजित कासलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून आज(शुक्रवार) पहाटे त्याला ताब्यात घेण्यात आले. पुण्यात आल्यानंतर कासले मीडियाशी संवाद साधताना धनंजय मुंडेंनी माझ्या खात्यावर 10 लाख रुपये पाठवल्याचा गौप्यस्फोट केला होता. मतदानाच्या दिवशी ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी मला हे पैसे देण्यात आले होते, असा दावा कासले याने केला होता.

रणजित कासले काल (गुरुवारी) दिल्लीवरून पुण्यात आला होता. तो रात्री पुण्यातील एका हाॅटेलमध्ये मुक्कामी होता. आपण पोलिसांना शरण जाणार असल्याचे त्याने अधिच जाहीर केले होते. मात्र, आज पहाटे बीड पोलिसांनी कारवाई करत त्याला हाॅटेलमधून ताब्यात घेतले.

Ranjeet Kasle On Walmik Karad News
Political Horoscope: महायुती-आघाडीमधील मतभेद उघडकीस येणार; नाशिक, रायगडचा तिढा सुटणार

बीड पोलिस दलात कार्यरत असताना गुजरातमध्ये जाऊन खंडणी मागितल्या प्रकरणी रणजित कासले याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर मागील काही दिवसांपासून तो व्हिडिओ बनवून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत होता. आपल्याला वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी ऑफर असल्याचे तसेच यासाठी 5 ते 50 कोटीही देण्यात येणार होते, असा दावा त्याने केला होता

कासले याने त्याला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरी ऑफर होती याविषयी पत्रकारांनी विचारले असता तो म्हणाले, एन्काऊंटरचे आदेश हे उघडपणे दिले जात नाहीत. याबाबत बंददाराआड चर्चा होत असते.

मुंडें चुकीच्या पद्धतीने निवडून आले

पुण्यात गुरुवारी रात्री पत्रकारांशी संवाद साधताना रणजित कासले म्हणाला की, निवडणुकीच्या काळात त्याची ड्युटी परळी विधानसभा मतदारसंघात होती. त्यावेळी त्याला ईव्हीएम मशीनपासून दूर राहण्यासाठी धनंजय मुंडेंनी 10 लाख रुपये दिले. कासले याने हा आरोप करताना आपले बँक स्टेटमेंट देखील दाखवले. ईव्हीएम मशीनशी छेडछाड होईल मी गप्प बसावे म्हणून मला पैसे देण्यात आले. मुंडे चुकीच्या पद्धतीने निवडून आले असल्याचेही कासले म्हणाला.

Ranjeet Kasle On Walmik Karad News
Kirit Somaiya News : किरीट सोमय्या झाडाझडतीसाठी नागपूर महापालिकेत; बांगलादेशींच्या बोगस दाखल्यांबाबत धक्कादायक माहिती समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com