Swati Mohol, Sharad Mohol  Sarkarnama
पुणे

Swati Mohol : स्वाती मोहोळ म्हणाल्या, 'माझा पती वाघ होता, मी वाघीण...'

Sharad Mohol Wife Swati Mohol : नीतेश राणेंनी घेतली मोहोळ कुटुंबीयांची भेट.

Sudesh Mitkar

Pune News : कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी राहत्या घराजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. शरद मोहोळ याचे भाजपच्या नेत्यांशी निकटचे संबंध होते. यामुळे भाजप आमदार नीतेश राणे यांनी सोमवारी मोहोळ कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

पुण्यातील कोथरुडमधील सुतारदरा भागात शुक्रवारी दुपारी कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad mohol) याला ठार करण्यात आले. चार अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर भरदिवसा गोळ्या झाडल्याने एकच खळबळ उडाली. हल्ल्यानंतर मोहोळला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तिथे त्याला मृत घोषित केले गेले. दरम्यान, या घटनेनंतर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली आणि आठ आरोपींना ताब्यातही घेतले.

या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी पुणे दौऱ्यावर असताना शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी माझ्या नवऱ्याला न्याय द्या, अशी मागणी त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली होती. यानंतर भाजपनेते नीतेश राणे (Nitesh rane ) यांनी मोहोळ कुटुंबीयांची भेट घेतली आहे. यावेळी मोहोळ कुटुंबीयांचे त्यांनी सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.

राणे म्हणाले, मोहोळ यांनी हिंदुत्वाचं काम केलं होतं. त्यामुळे हिंदुत्वाचा धागा पकडून आम्ही ताईंचं सांत्वन करायला आलो आहे. झालेल्या घटनेमुळे त्यांनी खचून न जाता यापुढेदेखील हिंदुत्वाचे काम चालू ठेवावे, अशी विनंती करण्यास आलो होतो. या घटनेमुळे हिंदुत्वाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये, आपलं काम सुरूच ठेवावं, अशी विनंती केली आहे.

हिंदुत्वाचे काम सुरूच ठेवणार

यावेळी स्वाती मोहोळ (Swati mohol) यांनीदेखील प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, माझा पोलिस प्रशासनावर आणि सरकारवर पूर्ण विश्वास आहे. माझे पती शरद मोहोळ हे हिंदुत्वाचे काम करीत होते. त्यामुळे त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला आहे. मात्र, मला त्या मारेकऱ्यांना सांगायचे, की मी हिंदुत्ववाद्याची बायको आहे. माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे. आम्ही हिंदुत्वाचे काम जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत असेच सुरू ठेवणार.

R...

SCROLL FOR NEXT