Chhatrapati Sambhaji Nagar : मराठी माणसांच्या, विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ओळखली जाते. राज्याच्या राजकारणात मनसेचा मोठा दबदबा आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेची विद्यार्थी सेना शाखा राज्यभरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करते. मुंबई ताकद असणाऱ्या मनसेने आता संभाजीनगरमध्येसुद्धा विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी विद्यार्थी सेनेची कमान आपल्या हाती घेत पदाधिकारी आणि विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अनेक मतदारसंघांमध्ये मनसेची भूमिका आणि त्यात विद्यार्थी सेनेचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठीच विद्यार्थी सेनेला घरोघरी पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगरात मनसेने इंग्रजी शाळांची फी व मनमानीच्याविरोधात आक्रमक आंदोलन करीत विद्यार्थी आणि पालकांना न्याय मिळवून दिलेला आहे. मनसेची विद्यार्थी सेना शहरात यामुळे चांगली चर्चेत आली होती. आता नववर्षाच्यानिमित्ताने विद्यार्थी सेना दिनदर्शिका वाटण्याच्यानिमित्ताने 20 हजार घरांपर्यंत पोहोचणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ अमित ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत झाला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राजीव जावळीकर, मनविसे जिल्हाध्यक्ष मंगेश साळवे, जिल्हा सचिव निखिल ताकवाले, कार्तिक फरकाडे-पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शुभम नवले-पाटील उपस्थित होते.
(Edited By Roshan More)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.