Sunil Shelke News : पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप युतीचे 19 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. यात राष्ट्रवादीचे 10 आणि भाजपच्या 9 नगरसेवकांचा समावेश आहे. एकूण 28 पैकी उर्वरित 9 जागांसाठी आणि नगराध्यक्षपदासाठी ही निवडणूक पार पडणार असून यासाठी 31 उमेदवार रिंगणात आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे (Sanjay Bala Bhegade) यांनी जुळवून घेत लोणावळा आणि तळेगाव नगरपरिषदेत युती केली आहे. यात वाटाघाटीनुसार, नगराध्यक्षपद पहिले अडीच वर्षांसाठी भाजपकडे आणि दुसऱ्या अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे राहणार आहे.
नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप युतीचे संतोष दाभाडे, अपक्ष उमेदवार माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे आणि माजी नगराध्यक्षा रंजना भोसले अशा 3 उमेदवारांमध्ये चुरस आहे. किशोर भेगडे हे बापूसाहेब भेगडे यांचे पुतणे आहेत. बापूसाहेब भेगडे हे मावळ मतदारसंघातून विधानसभेला सुनील शेळके यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढले होते.
सुनील शेळके (Sunil Shelake) यांनी 19 नगरसेवक बिनविरोध निवडून आणले, मात्र भाऊ सुदाम शेळके यांच्यासाठी त्यांना शेवटपर्यंत गणित जमवता आले नाही. सुदाम शेळके हे प्रभाग 8 मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे माजी नगरसेवक अमोल शेटे निवडणूक रिंगणात आहेत. आता भावाला निवडून आणण्याचे आव्हान आमदार शेळके यांच्यासमोर आहे.
कोण उमेदवार बिनविरोध?
भाजप- निखिल भगत, दीपक भेगडे, शोभा परदेशी, सिया चिमटे, अश्विनी शेळके, इंद्रकुमार ओसवाल, विनोद भेगडे, सागर बोडके, सुरेखा भेगडे.
राष्ट्रवादी काँग्रेस - संदीप शेळके, गणेश काकडे, हेमलता खळदे, आशा भेगडे, संतोष भेगडे, शैलजा काळोखे, सत्यम खांडगे, स्नेहा खांडगे, कमल टकले, सोनाली दरेकर.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.