Supriya Sule Vs Ajit Pawar  Sarkarnama
पुणे

Sule Vs Pawar : धमक्या देणाऱ्यांना सांगा, विधानसभा फार लांब नाही; सुप्रिया सुळेंनी अजितदादांना ललकारले

Vijaykumar Dudhale

Pune, 2 May : बारामती लोकसभा मतदारसंघातील लढाई दिवसेंदिवस अधिक टोकदार हेात चालली आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात खासदार सुप्रिया सुळे अधिक आक्रम होताना दिसत आहेत. आता लोकसभेच्या निवडणुकीत जे धमक्या देत आहेत, भीती दाखवत आहेत, त्यांना सांगा की विधानसभेची निवडणुका फार लांब नाहीत, असा इशारा त्यांनी अजित पवारांना दिल्याचे मानले जात आहे.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारासाठी पुरंदर तालुक्यातील नीरा येथे महाविकास आघाडीच्या वतीने गुरुवारी (ता. 2 मे) जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी विधानसभा निवडणुका (Assembly Election) लवकरच आहेत, हेही लक्षात ठेवा, असे आव्हान दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आता काहीजण धमक्या देत आहेत, काही लोकांना भीती दाखवली जात आहे. पण त्यांना सांगा की विधानसभेच्या निवडणुकाही फार लांब नाहीत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बॅंक तसेच ग्रामपचायतींच्या सुद्धा निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लढवणार आहोत. बॅंका आणि कारखाने कुणाचेही मक्तेदारी नाही.

सुप्रिया सुळे यांच्या इशाऱ्यामुळे बारामती (Baramati) तालुक्यातील माळेगाव आणि सोमेश्वर सहकारी कारखाने आणि पुणे जिल्हा बॅंकेची निवडणूक उपमुख्यमंंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात लढविण्याचे संकेत दिले आहेत. कारखाने, बॅंका, खरेदी विक्री संघ, दूध संघ, बाजार समितीच्या निवडणुकाही आता रंगतदार होणार आहेत, हे सुप्रिया सुळेंच्या ताज्या विधानावरून दिसून येते.

मोदी सरकारच्या इथेनॉलच्या धोरणांमुळे महाराष्ट्राचे तीन हजार कोटी रुपयांचे, तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिटन तीनशे रुपयांचे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारच्या शेतीविरोधी धोरणांवर बोलणारी मी एकमेव खासदार आहे. ‘तुमचे कारखाने आहे, फार पैसे मिळतात,’ असे पियूष गोयला एकदा मला म्हणाले होते. त्यांना सांगितले की, माझा एकही साखर कारखाना नाही. भाजपचे लोक शरद पवार यांना भेटले, त्यानंतर इथेनॉल धोरणात थोडा दिलासा मिळाला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपचे लोक बोलत नाहीत. ते शेतकऱ्यांना गोळ्या घालतात. भाजप मंत्र्यांचा मुलगा शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालतो. या परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या शरद पवारांना साथ द्यायची सोडून काही लोक सूर्याजी पिसाळ होऊन पवारांचे पाय खेचण्याची किमया करत आहेत. त्यांना बाकीच्याशी काहीही देणं घेणं नाही, अशा शब्दांत रोहित आर. आर. पाटील यांनी अजित पवारांचे नाव न घेता टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT