Dharashiv, 2 May : राजकारणात काम करणाऱ्याला लोक डोक्यावर घेतात अन् मतदारांकडे पाठ फिरवणाऱ्याला खाली पाडतात. राज्यात आणि देशात याचा अनुभव अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना कधी ना कधी येतो. सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेकांना हा अनुभव येत आहे. मराठवाड्यातील लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना एक सुखःद अनुभव आला.
लोकांचे प्रेम काय असते, याची प्रचिती देणाऱ्या या क्षणामुळे ते भारावून गेले आणि लोकसभा निवडणुकीसाठी (Lok sabha Election) चिंच फोडून सोळाशे रुपयांची मदत करणाऱ्या आपल्या बहिणीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्याचे झाले असे की, मंगरूळ (ता. तुळजापूर) येथील ज्ञानेश्वरी मनोज डोंगरे हिने चिंचा फोडून स्वकष्टाने कमावलेले 1600 रुपये रोख मदत म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या आईकडे सुपूर्द केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सध्याच्या युगात जिथे राजकारणाचा विचका झालाय आणि बहुतांश राजकारण्यांना लोक शिव्या देतात, अशावेळी वेगवेगळ्या ठिकाणी दौऱ्यादरम्यान लोकांचे मिळणारे प्रेम, आपुलकी बघून कृतकृत्य झाल्याची जाणीव होते. अनेक सामान्य नागरिक जे स्वतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, असे लोक स्वतः च्या पोटाला चिमटा देऊन माझ्यासाठी आर्थिक मदत घेऊन पुढे येत आहेत. त्यांच्या मदतीची रक्कम ही अनेक करोडो रुपयांना भारी आहे. कारण त्यात त्यांची आपलुकी आहे, अशी भावना ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली.
ज्ञानेश्वरी मनोज डोंगरे हिने चिंचा फोडून स्वकष्टाने कमावलेले सोळाशे रुपये रोख मदत नुकतीच ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या मातोश्रींकडे सुपूर्त केली. जनतेचे माझ्यावरील हे प्रेम कायम असेच राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ज्ञानेश्वरी तुझा हा भाऊ तुझे हे प्रेम कायम स्मरणात ठेवील, अशा शब्दांत ओमराजे यांनी जीवनात ही घडी अशीच राहू दे, अशा भावना व्यक्त केल्या.
ओमराजे यांची धाराशिवमध्ये महायुतीच्या अर्चना पाटील यांच्याविरुद्ध थेट लढत आहे. संपूर्ण राज्याचे या मतदारसंघाकडे लक्ष लागले असून दोन्ही बाजूंनी होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपाने वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात शिवसेना पक्षात फुट पडल्यानंतर ओमराजे निंबाळर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. या निष्ठेचे फळ त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देत ठाकरेंनी दिले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.