TET exam paper leak

 

Sarkarnama

पुणे

टीईटी परीक्षा : जीए सॉफ्टवेअरने घेतलेल्या २०१७ च्या परीक्षेची चौकशी होणार

सुखदेव डेरे (Sukhdev Dere) व तुकाराम सुपे (Tukaram Dere) या परीक्षा परिषदेच्या दोन माजी आयुक्तांचा समावेश आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेच्या (TET) गोंधळ कमी होण्याऐवजी वाढण्याची चिन्हे आहेत.आतापर्यंत २०२० व २०१८ च्या परीक्षांमधील गैरप्रकार समोर आला असून २०१७ साली घेतलेल्या परीक्षेबाबत संशय निर्माण झाला असून यासंदर्भाने पोलीस (Police) चौकशी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.जीए सॉफ्टवेअर टेक्नालॉजी प्रायव्हेट लिमिटेड (GA SoftWare) या कंपनीमार्फत २०१७ पासून परीक्षा घेण्यात आल्याने या परीक्षेबाबत संशयाला जागा निर्माण झाली आहे.

२०२० व २०१८ या दोन वर्षात घेतलेल्या परीक्षांच्या गैरप्रकारात आतापर्यंत आठजणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सुखदेव डेरे व तुकाराम सुपे या परीक्षा परिषदेच्या दोन माजी आयुक्तांचा समावेश आहे.जीए सॉफ्टवेअर टेक्नालॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पहिल्यांदा २०१७ साली परीक्षेचे काम घेतले होते. त्यामुळे २०१७ साली झालेल्या परीक्षेबाबत शंका उपस्थित करण्यात येऊ लागली आहे.

टीईटी ही पात्रता परीक्षा २०१३ साली सुरू करण्यात आली.पहिली ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी ही पात्रता परीक्षा ठरविण्यात आली. २०१५ साली ही परीक्षा सरकारी, सरकारी अनुदानीत तसेच खासगी शाळांत शिक्षक होण्यासाठी सक्तीची करण्यात आली. त्यानुसार २०१६ साली परीक्षा झाली. मात्र, पेपर फुटल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर जीए कंपनीकडे पहिल्यांदा परीक्षेचे काम देण्यात आले.२०२० साली घेतलेल्या टीईटी परीक्षांचा गैरप्रकार उजेडात आल्यानंतर या प्रकरणी सर्वप्रथम परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या तपासात २०१८ च्या परीक्षेतदेखील गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी आज सुखदेव डेरे यांनाही अटक करण्यात आली. त्यामुळे २०१७ परीक्षेबाबत संशय वाढला आहे.

पुणे पोलिसांचा सायबर सेल या साऱ्या प्रकरणाची चौकशी करीत असून खोलवर चौकशी झाल्यास यातून बऱ्याच गोष्टी बाहेर येऊ शकतील, असे पोलीस आधिकारी सांगत आहेत. दरम्यान, या प्रकरणात शेवटच्या आरोपीपर्यंत पोचण्यासाठी काटेकोरपणे तपास करण्यात येत असल्याचे पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT