टीईटी २०१८ च्या परीक्षेतही झाला होता घोटाळा

या प्रकरणात तपासात उघड झालेला आकडा सुमारे पाच कोटी रूपयापर्यंतचा आहे.
तुकाराम सुपे

तुकाराम सुपे

सरकारनामा

Published on
Updated on

पुणे : शिक्षक पात्रततेसाठी (टीईटी) २०१८ साली झालेल्या परीक्षेतदेखील घोटाळा झाल्याचे उघड झाले असून सुमारे पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांकडून पैसे गोळा करण्यात आल्याचे आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत आज ही माहिती दिली.

<div class="paragraphs"><p>तुकाराम सुपे</p></div>
नगरपंचायत निवडणूक: माळशिरसमध्ये भाजपा-राष्ट्रवादीत तर नातेपुतेमध्ये आघाड्यांमध्ये चुरस

या प्रकरणात आतापर्यंत आठजणांना अटक करण्यात आली आहे.परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यानंतर सुखदेव डेरे यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणात जीए सॉफ्टवेअर या कंपनीचा संचालक आश्‍विनकुमार यास बंगळुरू येथून ताब्यात घेण्यात आल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>तुकाराम सुपे</p></div>
‘एफआरपीची मोडतोड करणाऱ्या कारखान्यांना १५ टक्के व्याज द्यावे लागणार

आयुक्त गुप्ता म्हणाले, ‘‘ या प्रकरणात तपासात उघड झालेला आकडा सुमारे पाच कोटी रूपयापर्यंतचा आहे. चौकशीत आणखी बऱ्याच गोष्टी समोर येऊ शकतात. सुमारे पाचशे विद्यार्थ्यांकडून पैसे घेण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून हा आकडादेखील वाढण्याची शक्यता आहे.२०१८ च्या परीक्षेत डेरे व आश्‍विनीकुमार यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले असून तपासातून अनेक बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.’’

आरोग्य भरती परीक्षा, म्हाडा भरती परीक्षेपाठोपाठ टीईटी परीक्षेतही घोटाळा झाल्याचे उघड झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. गेले महिनाभरापासून एकोपाठोपाठ या सर्व प्रकरणांच्या बातम्या येऊ लागल्याने या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com