Uddhav Thackeray  Sarkarnama
पुणे

मोठी बातमी : ठाकरेंच्या शिवनेरी दौऱ्याला पुरातत्त्व विभागाचा खोडा

Ram Mandir Ceremony : हेलिपॅड तयार करण्यासाठी परवानगी न मिळाल्याने दौरा होणार रद्द ?

सरकारनामा ब्यूरो

गणेश कोरे

Pune News : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 21 जानेवारीला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती श्री शिवाजीमहाराजांच्या जन्मस्थळी भेट देणार आहेत. ठाकरे यांच्या शिवनेरी दौऱ्याला केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी अद्याप परवानगी न मिळाल्याने दौरा रद्द होणार का? अशी शंका व्यक्त केली जात आहे. शिवनेरी किल्ल्यावर हेलिपॅड तयार करण्यासाठी गेलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना अद्याप कामाला परवानगी मिळाली नाही.

अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 जानेवारीला पार पडणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती श्री शिवाजीमहाराजांच्या जन्मस्थळी भेट देणार आहेत. त्यासोबतच नाशिकच्या काळाराम मंदिरात महाआरतीदेखील करणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अयोध्येत रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना 22 जानेवारीला होत असून, या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुखांना निमंत्रित करण्यात आले नसल्याने, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने नाशिकच्या काळाराम मंदिरात महाआरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यापूर्वी रविवारी 21 जानेवारीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पत्नी रश्‍मी ठाकरे, शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे आणि पदाधिकारी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती श्री शिवाजीमहाराजांच्या जन्मस्थळी नतमस्तक होणार असल्याचे जाहीर केले होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या कामाला गती मिळावी, यासाठी ‘पहिले मंदिर फिर सरकार’चा नारा देत दोन वर्षांपूर्वी शिवनेरी किल्ल्याची माती अयोध्येला नेत विधिवत पूजा केली होती. यानंतर राम मंदिराच्या उभारणीला गती मिळाल्याची भावना शिवसेनेची झाली आहे.

शिवसेनेत फूट पडल्यामुळे भाजप आणि ठाकरे गट यांच्यातील राजकीय वैर चांगलेच वाढले आहे. मात्र, राम मंदिरासाठी शिवसेनेनेदेखील कारसेवा केली आहे. राम मंदिर उभारणी लढ्यात शिवसेना पक्ष आणि शिवसैनिकांचा सक्रिय सहभाग होता. यामुळे राम मंदिर होत असल्याचा आनंद शिवसेना पक्ष आणि शिवसैनिकांनाही आहे. त्यामुळे या दौऱ्याची जय्यत तयारी जिल्हाप्रमुख सुरेश भोर, जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू होती. मात्र अद्याप केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या दिल्ली कार्यालयातून हेलिकॉप्टर लँडिंगला परवानगी न मिळाल्याने ठाकरे यांचा दौरा अधांतरी आहे.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT