अयोध्येत श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सध्या ज्या पद्धतीने होत आहे, त्याला काही शंकराचार्यांनी विरोध केला आहे. त्यावरून भाजपचे काही नेते, तसेच केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्यांवर टीका केली होती. या संपूर्ण प्रकारावरून ठाकरे गटाने पुन्हा एकदा भाजपवर टीकेचा असूड ओढला आहे.
जे शंकराचार्यांचे ऐकत नाहीत ते हिंदूंचे कैवारी कसे होऊ शकतात? असा थेट सवाल ठाकरे गटाकडून विचारण्यात आला आहे. भाजपने बहुजनांच्या हिंदुत्वाच्या चिंधड्या केल्या आहेत. राम मंदिर सोहळ्याचे (Ayodhya) राजकीयकरण केले. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम सर्व पाहतो आहे. तोच भाजपच्या (BJP) गर्विष्ठ राजकारणाचा अंत करेल, अशी सडेतोड टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक (Nashik) जिल्हा ग्रामीण संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी केली.
अयोध्येतील श्रीराम मंदिर (Ayodhya Ram Mandir) सोहळ्याचे राजकारण करण्यासाठी शंकराचार्य काय सांगतात, याकडे भाजपने दुर्लक्ष केले. हिंदू धर्मात शंकराचार्यांचे महत्त्व आहे. धर्मपीठ म्हणून शंकराचार्यांकडे पाहिले जाते. पण राजकीय स्वार्थ साधण्याच्या नादात भाजपच्या नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शंकराचार्यांचे ऐकत नसतील ते हिंदू कसे, असा प्रश्न दिंडे यांनी उपस्थित केला आहे.
राममुक्ती आंदोलन विश्व हिंदू परिषद आणि शिवसेनेने पुढे नेले. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी वाद असलेल्या ठिकाणावरील कुलूप तोडून रामलल्लाला मुक्त केले होते. त्यात भाजपचा काडीचाही संबंध नव्हता. गर्व से कहो हम हिंदू है हा बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला नारा भाजपने उचलून पुढे रथयात्रा काढली. भक्ती आणि राजकारणातील अंतर संपवण्याचे काम सत्ताधारी करीत असून, त्यात त्यांना कधीही यश मिळणार नाही, असा दावा दिंडे यांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिवेशन असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सभादेखील होणार आहे. या सभेची तयारी सुरू असून, कृत्रिम वातावरण टिकणार नाही, असा दावा जयंत दिंडे यांनी केला.
शिवसेना-भाजप यांची युती होती तेव्हापासून दिंडोरी मतदारसंघ भाजपकडे होता. तर, राष्ट्रवादी समोर असायची. यावेळी परिस्थिती बदलली असली तरी आम्ही दिंडोरी मतदारसंघावर हक्क सांगणार नाही, अशी भूमिका संपर्कप्रमुख दिंडे यांनी सांगितली. या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद नक्कीच आहे. मात्र, वरिष्ठ पातळीवर येणाऱ्या आदेशाचे पालन केले जाईल. दिंडे यांच्या या दाव्यामुळे ही जागा महाआघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी निश्चित मानली जाते आहे.
(Edited by Avinash Chandane)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.